file photo
file photo 
विदर्भ

तरुणाचा विहिरीत बुडून मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

शेंबाळपिंपरी (यवतमाळ) : हिवळणी पालमपट येथील 23वर्षीय तरुणाचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. रोज मोलमजुरीसाठी गेलेल्या या तरुणाच्या मृत्यूने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. 
शेतकरी कुटुंबातील अविवाहित असलेला राजेश तुकाराम कवाने (वय 23) हा नांदेड जिल्ह्यातील इस्लामपूर पोलिस ठाण्याअंतर्गत असलेल्या भीसी या गावी स्वत:चे मळणीयंत्र घेऊन सोयाबीन काढणीसाठी गेलेला होता. दरम्यान, बुधवारी (ता.9) दिवसभर काम आटोपल्यावर अंघोळ करण्यासाठी शेजारील शेतामधील विहिरीत तीन मित्रांसह तो गेला. पोहणे येत नसले तरी अंघोळीसाठी पाण्यात उतरलेल्या राजेशला पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने विहिरीत बुडून त्याचा मृत्यू झाला. सोबत असलेल्या मित्रांनी पोबारा केल्याने त्याला वेळीच मदत होऊ शकली नाही. दुसऱ्या दिवशी पोलिसांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने पाण्याच्या गाळात फसलेल्या राजेशचा मृतदेह बाहेर काढला. उत्तरीय तपासणीनंतर हिवळणी पालमपट येथे त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सध्या सोयाबीन काढणीचा हंगाम जोरात असून, मळणीयंत्रावर काम करणारे मजूर व इतर कामगारांना योग्य प्रशिक्षणाच्या अभावाने अनेक अपघात होत असल्याचे दिसून येत आहे. त्यात कोणताही विचार न करता केलेले धाडस जिवावर बेतू शकते, हे आजच्या दुर्दैवी घटनेतून दिसून येते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : राजस्थान क्वालिफाय करणार की हैदराबाद मजबूत स्थितीत पोहचणार?

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

PPF : दररोज 250 रुपये वाचवून तयार होईल 24 लाखांचा फंड, कसा ते वाचा ?

Rinku Singh T20 WC 2024 : रोहितला जास्त पर्याय... रिंकू सिंहला वगळण्याबाबत अजित आगरकर काय म्हणाला?

SCROLL FOR NEXT