विदर्भ

यवतमाळ जिल्ह्यातील अरुणावती धरणात बुडून तरुणाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

दिग्रस (जि. यवतमाळ) : येथील दारव्हा रस्त्यावरील अरुणावती धरणात पोहताना तरुणाचा बुडून मृत्यू (Young man drowned) झाला. ही घटना शनिवारी (ता. २९) दुपारी तीनच्या सुमारास घडली. भावेश प्रेमकुमार तिवारी (वय २२, रा. लक्ष्मीनगर, दिग्रस) असे मृताचे नाव आहे. (Young man drowns in Arunavati dam in Yavatmal district)

भावेशसह पाच मित्र ऑटो धुण्यासाठी धरणावर गेले असताना भावेशला पोहण्याचा मोह न आवरल्याने पाण्यात उतरला. मात्र, आपण पाण्यात बुडत असल्याचे लक्षात येताच त्याने मित्रांना आवाज दिला. त्याला वाचविण्यासाठी एक मित्र धावून गेला. परंतु, त्याला त्याचा जीव वाचविण्यात यश आले नाही. तरुण बुडाल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक धीरेंद्रसिंह बिलवाल यांना मिळताच उपनिरीक्षक शशिकिरण नावकार, सुभाष चिरमाडे, गणेश नाटकर, एजास आलमवाले, अजहर व पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांनी घटनास्थळी मच्छीमारांच्या मदतीने सायंकाळी सातपर्यंत तरुणाचा शोध घेतला असता मिळून आला नाही. म्हणून रविवारी (ता. ३०) सकाळी सात वाजता काही नागरिकांना मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला. त्याला बाहेर काढून शवविच्छेदनासाठी दिग्रस ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. याबाबत दिग्रस पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास दिग्रस पोलिस करीत आहे.

(Young man drowns in Arunavati dam in Yavatmal district)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court Bench : पुणे येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ सुरु करण्याची आमदार कुल यांची अधिवेशनात मागणी

Nimisha Priya: तूर्तास फाशी टळली, आता पुढे काय? जाणून घ्या नेमकं काय आहे येमेनमधील निमिषा प्रिया प्रकरण

Israel attacks Syria: इस्राईलकडून सीरियाच्या मंत्रालयावर हल्ला! लष्कराचे मुख्यालयही टार्गेट; हल्ल्याचं कारण केलं स्पष्ट

Mumbai Railway Station: स्थानकांवरील कामे तत्काळ पूर्ण करा, शिंदेसेना खासदारांचा रेल्वेला आंदोलनाचा इशारा

Latest Maharashtra News Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT