young man molested a married woman in Amravati 
विदर्भ

युवकाची विवाहितेकडे लग्नासाठी अजबगजब मागणी; पतीला बघून काढला पळ

संतोष ताकपिरे

अमरावती : लग्न केल्यानंतर ती दुसऱ्याची झाली. परंतु, तिच्यावर जिवापाड प्रेम करीत असल्याचे भासवून युवकाने लग्नाचा प्रस्ताव ठेवला व असभ्य वर्तन केले. एकेठिकाणी पतीला बघून युवकाने पळ काढला. वरुड ठाण्याच्या हद्दीत एका ऑटो थांब्यावर ही घटना घडली.

महिलेचे (वय २४) लग्न झाल्यावरसुद्धा संशयित आरोपी युवक जो वयाने तिच्यापेक्षा दोन वर्षांनी लहान आहे. परंतु, तिच्या एकतर्फी प्रेमात पडला. विवाहितेच्या मोबाईल नंबरवर वारंवार संपर्क करून ‘मी तुमच्यावर प्रेम करतो, माझ्यासोबत चला, लग्न करतो’. अशा एक नव्हे अनेक विनवण्या युवकाने बोलताना केल्या.

विवाहिता एक दिवस आपल्या पतीसोबत दुचाकीने गावाकडे परत जात असताना एका ऑटो थांब्याजवळ भेळपुरी खाण्याकरिता थांबली होती. परंतु, एकतर्फी प्रेम करणाऱ्या युवकाने भेळपुरीच्या गाडीपर्यंत विवाहितेचा पाठलाग करून तिला गाठले. पती शेजारी असताना त्याच्या नकळत महिलेसोबत जवळीक साधण्याचा युवकाने प्रयत्न केला.

पत्नीसोबत लगट करण्याच्या प्रयत्नात असलेल्या युवकाचा डाव पतीच्या लक्षात आला. आपण पकडल्या जाऊ या भीतीने एकतर्फी प्रेमात पडलेल्या युवकाने तेथून पळ काढला. पीडित नवविवाहितेने वरुड पोलिसांत याप्रकरणी तक्रार नोंदविली.

पोलिसांनी संशयित युवकाविरुद्ध विनयभंग, ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. वरुड पोलिसांशी संपर्क साधला असता सोमवारपर्यंत महिलेचा पाठलाग करून असभ्य वर्तन करणाऱ्या युवकास अटक झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asha Bhosle Favorite Leader : आशा भोसलेंचा आवडता नेता कोण? भारदस्त आवाज असणारा नेता अत्यंत जिवलग मित्र...

IPL 2026, LSG vs GT: शुभमन गिलने जिंकला टॉस; गुजरात - लखनौच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये काय झाले बदल?

Leopard attack Jalgaon : जळगावमध्ये बिबट्याची दहशत; आमदार चंद्रकांत पाटील जखमी, तीन तासांच्या थरारानंतर बिबट्या जेरबंद

Asha Bhosle: संगीतविश्वातील सुरांची ‘सम्राज्ञी’ काळाच्या पडद्याआड: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, संगीत क्षेत्रातील एका सुवर्णयुगाचा अंत!

फक्त संगीतातच नाहीतर पाककलेत सुद्धा अव्वल होत्या आशा भोसले, जगभरात रेस्टॉरंट आणि...

SCROLL FOR NEXT