file photo
file photo 
विदर्भ

नळावर पाणी भरण्यासाठी गेलेल्या विवाहित महिलेवर तरुणाचा अत्याचार; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

तुषार अतकारे

वणी (जि. यवतमाळ) : आपल्या घराशेजारीच असलेल्या नळावर पाणी भरण्यासाठी गेलेल्या एका विवाहित तरुणीवर अत्याचार झाल्याची घटना शुक्रवारी (ता. ३०) उघडकीस आली. याबाबतची फिर्याद पीडित विवाहितेने वणी पोलिस ठाण्यात दिली आहे.

त्यावरून एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

बळजबरीने ओढून नेले घरात

शहरातील सेवानगर परिसरात वास्तव्यास असलेली विवाहिता गेल्या मंगळवारी (ता. २७) नळावर पाणी भरण्यासाठी गेलेली होती. त्यावेळी संशयित आरोपी चेतन भटवलकर (वय २०, रा. सेवानगर, वणी) याने विवाहितेला बळजबरीने घरात ओढून तिच्यावर अत्याचार केल्याचे पीडितेने वणी पोलिस ठाण्यात शुक्रवारी (ता. ३०) दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

पीडितेने केली पोलिस ठाण्यात तक्रार

मंगळवारी घडलेल्या या अनपेक्षित प्रकारानंतर कमालीची घाबरलेल्या विवाहितेने दोन दिवसांनंतर म्हणजे शुक्रवारी घडलेला प्रकार आपल्या पतीला सांगितला. त्यानंतर दोघांनी थेट वणी पोलिस ठाणे गाठून रीतसर तक्रार दाखल केली.


आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी संशयित आरोपी चेतन भटवलकरविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. संशयिताला ताब्यात घेण्यात आले असून, पीडितेला वैद्यकीय चाचणीसाठी यवतमाळ येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. या घटनेचा तपास पोलिस करीत आहेत.

(संपादन : दुलिराम रहांगडाले)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election : PM मोदींबद्दलच्या टिप्पणीनंतर भाजपमधून हकालपट्टी, आता पोलिसांनी केली अटक; जाणून घ्या प्रकरण

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे कोल्हापुरात; म्हणाले, खोके सरकारने एकही नवा उद्योग आणला नाही

Mumbai Indians : भारी खेळतोय मात्र तिलक वर्मा मुंबई इंडियन्ससाठी 'अनलकी' ठरतोय? पाहा आकडेवारी काय सांगते

NCB अन् ATS ची मोठी कारवाई! गुजरातच्या सीमेवर 80 किलो ड्रग्ससह 14 पाकिस्तानी अटकेत

Lok Sabha Election : AAPने निवडणूक प्रचारासाठी तयार केलेले 'ते' गाणे वापरण्यास निवडणूक आयोगाची मनाई; नेमकं काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT