Young man threatens acid attack on married woman 
विदर्भ

बारा वाजता भेटायला ये, अन्यथा ऍसिड हल्ला

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : बारा वाजता भेटायला ये, न भेटल्यास ऍसिड हल्ला करेल, अशी धमकी युवकाने विवाहितेला दिली. नांदगावखंडेश्वर तालुक्‍यातील एका गावात ही घटना घडली. मंगरुळचव्हाळा ठाण्यात प्राजक्त देशमुख (वय 32) या युवकाविरुद्ध पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच त्याने गावातून पळ काढला.

एका विवाहितेसोबत त्याची जुनी ओळख होती. तिचा मोबाईल क्रमांक असल्याने तो तिला अनेकदा फोनसुद्धा करीत होता. त्याने महिलेशी जवळीक साधण्याचा प्रयत्न सुरू केला. त्याचा हेतू महिलेच्या लक्षात येताच तिने त्याला टाळण्याचा प्रयत्न सुरू केला. अखेर त्याने गावात जाऊन पीडितेला गाठले. फोनवर संपर्क करूनही का प्रतिसाद देत नाही, याबद्दल जाब विचारला.

तिला मध्यरात्री 12 वाजता भेटायला येण्याचा निरोप दिला. भेटीसाठी न आल्यास ऍसिड हल्ला करून हत्या करण्याची त्या युवकाने तिला धमकी दिली. शिवीगाळ केली, असा आरोप पीडितेने मंगरुळचव्हाळा ठाण्यात दाखल तक्रारीत केला. आपल्या विरुद्ध तक्रार दिल्याची कुणकूण लागताच प्राजक्त फरार झाल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

धारणी तालुक्‍यातील एक 18 वर्षीय युवती एकटी बकऱ्या चारत असल्याचे बघून रवी धिकार (रा. चिंचोली) हा दुचाकी घेऊन तिच्याजवळ गेला. तिला जंगलमे जायेंगे अशी ऑफर दिली. युवतीने त्याला नकार दिला. पीडितेच्या तक्रारीवरून धारणी पोलिसांनी रवीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant Nandani : अखेर माधुरी हत्तीण दोन दिवसात कोल्हापुरात येणार! वनतारातून नांदणीकडे प्रस्थान; राजू शेट्टीनी सोशल मीडियावर दिली माहिती

India T20I Squad : हर्षित राणाला नवी दुखापत, अफगाणिस्तान मालिका अन् Asian Games ला मुकणार! विदर्भाच्या खेळाडूला टीम इंडियात संधी

मुंबई गोवा हायवेच्या उद्घाटनाला येणार नाही, लाज वाटते; गडकरींचे विधान, म्हणाले, आता वेगळा वर्ल्ड रेकॉर्ड करायचाय

AirPods 5 India Price: 5 तासांची बॅटरी अन् वायरलेस चार्जिंग! Appleने लाँच केले सर्वात स्वस्त ANC इयरबड्स; पहा खास फीचर्स...

Marathi News Live Updates : मुंबईला जाणारच, १२ तारखेला घोषणा करणार - मनोज जरांगे पाटील

SCROLL FOR NEXT