Narayan Wekhande
Narayan Wekhande 
विदर्भ

स्वातंत्र्यानंतर सलग मतदान करणारा तरुण 

सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य असतानाही अनेकजण ते टाळतात. शासनाने मतदानासाठी दिलेली सुट्टी काही लोक केवळ घरी आराम करण्यात घालवतात. अशा नागरिकांसाठी एका 94 वर्षांच्या "तरुण' आजोबाने आदर्श निर्माण केला आहे. या आजोबांनी आजसुद्धा विधानसभा निवडणुकीसाठी तेवढ्याच उत्साहात मतदान करून आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले आहे. 
या "तरुण' आजोबांचे नाव आहे नारायण वेखंडे. यवतमाळच्या शिवाजीनगरात ते राहतात. निवृत्त शिक्षणाधिकारी असलेले नारायण वेखंडे यांनी आज सकाळी यवतमाळ शहरातील विवेकानंद विद्यालयातील मतदान केंद्रात व्हीलचेअरवर जाऊन मतदान केले. आपला देश स्वतंत्र झाला तेव्हापासून झालेल्या ग्रामपंचायत ते लोकसभा या सर्वच निवडणुकांमध्ये त्यांनी आजवर न चुकता मतदान केले आहे, हे विशेष. मी आपल्या कर्तव्यापोटी किती जागरूक आहे, हे त्यांनी आज वयाच्या 94 व्या वर्षी मतदान करून इतरांना दाखवून दिले आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT