विदर्भ

तरुणाई घेणार "डिजिटल थिंकिंग'चा मंत्र

सकाळ वृत्तसेवा
नागपूर : "सकाळ'च्या यंग इन्स्पिरेटर्स (यिन) यिनफेस्टच्या माध्यमातून "यिन टॉक'च्या कार्यक्रमात "डिजिटल थिंकिंग' या विषयावर तरुणांशी संवाद साधल्या जाणार आहे. नागपुरात मंगळवारी (ता. 3) सकाळी 11 ला जे.डी. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ऍन्ड मॅनेजमेंटच्या सभागृहात हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. त्यात मार्केटिंग गुरू व यू-ट्यूबर साहिल खन्ना, "किलोबिटर्स'च्या सहसंस्थापक श्‍यामा मेनन, सोशल मीडिया तज्ज्ञ अवी आर्या तरुणांशी संवाद साधणार आहेत.
संगीत, चित्रकला, गप्पा व वैविध्यपूर्ण कलागुणांचा आविष्कार असलेला "यिनफेस्ट' नागपूरसह मुंबई, पुणे आणि औरंगाबादमध्ये आयोजित करण्यात आला आहे. "डिजिटल थिंकिंग' या विषयावर "यिन टॉक' शोमध्ये तरुणाईसोबत गप्पा रंगणार आहेत. राज्यभरात विविध कार्यक्रमात तरुणाईसमोर डिजिटल क्षेत्रातील अनुभव उलगडणार आहे. यावेळी या विषयावरील तज्ज्ञ डिजिटल क्षेत्रावर संवाद साधतील. "यिन टॉक'मध्ये "इम्पॅक्‍टिंग डिजिटल स्पेस एज यू-ट्यूबर' या विषयावर मार्केटिंग गुरू व यू-ट्यूबर साहिल खन्ना, "इनकॉर्पोरेटिंग हेल्थ इन डिजिटल स्पेस' या विषयावर "किलोबिटर्स'च्या सहसंस्थापक श्‍यामा मेनन आणि "डिजिटल मार्केटिंग फॉर हॉस्पिटॅलिटी' या विषयावर सोशल मीडिया तज्ज्ञ अवी आर्या विद्यार्थ्यांशी संवाद साधतील. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहे. अधिक माहितीसाठी विकास मार्कंडे (9730848018), अमोल कडूकर (9270131580) यांच्याशी संपर्क साधावा.
तज्ज्ञांकडून मार्गदर्शन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल इंडियाचा मंत्र दिला. त्यामुळे देशात मोठी डिजिटल क्रांती होत आहे. तरुणाईमध्ये डिजिटलविषयी बरेच आकर्षण आहे. यातून येणाऱ्या नवकल्पनांची बहुराष्ट्रीय कंपन्यासंह सामान्य नागरिकांना गरज आहे. डिजिटलचा वापर अधिक प्रभावी कसा करता येईल, त्यातून देशाला बळकट करण्यासाठी काय करता येईल, तरुणाईचे त्याबद्दलची भावना आणि त्यांच्यासमोर असलेले विविध प्रश्‍न यावरही या "यिन टॉक'मध्ये तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
कार्यक्रम स्थळ
- जे.डी. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ऍन्ड मॅनेजमेंटचे सभागृह
- वेळ 11 वाजता
-विषय -
"इम्पॅक्‍टिंग डिजिटल स्पेस एज यू-ट्यूबर' - साहिल खन्ना,
"इनकॉर्पोरेटिंग हेल्थ इन डिजिटल स्पेस' - श्‍यामा मेनन,
- "डिजिटल मार्केटिंग फॉर हॉस्पिटॅलिटी' - अवी आर्या
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran War Ceasefire Talks : मोठी बातमी ! इराण युद्धबंदीच्या चर्चेसाठी तयार पण... डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितला नेमका अडथळा काय?

Ladki Bahin Yojana Update : लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! फेब्रुवारी अन् मार्चचा हप्ता एकाच वेळी मिळणार, तारीखही आली समोर...

Hadapsar Station: हडपसर स्थानकात चौथ्या फलाटाला मंजुरी; प्रवाशांची सोय, विस्तार झाल्याने रेल्वे गाड्यांची संख्या वाढणार

Heart & Kidney Disease Detection Tool: मधुमेहामुळे हार्ट आणि किडनीवर येणारा ताण आता आधीच ओळखता येणार; डॉक्टरांसाठी नवीन स्मार्ट टूल लाँच!

Summer Travel 2026: यंदा उन्हाळी पर्यटनाला महागाईच्या झळा; विमान कंपन्यांकडून भाडेवाढ शक्य, आधीच बुकिंगचा तज्ज्ञांकडून सल्ला

SCROLL FOR NEXT