विदर्भ

तरूणीची 81 हजारांनी फसवणूक

सकाळ वृत्तसेवा
नागपूर : एका तरुणीची एचडीएफसी बॅंकेत नोकरी लावून देण्याच्या नावावर 81 हजारांनी फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी पीडित तरुणी आत्रेई बॅनर्जी (25, रा. राष्ट्रसंत तुकडोजी अपार्टमेंट, झिंगाबाई टाकळी) यांच्या तक्रारीवरून 5 आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. आरोपींमध्ये अनामिका, अभिषेक, सुधांशू, पूजा आणि दीपक नावाच्या व्यक्तींचा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्रेई पदवीधर असून सध्या मिहान येथील एका कंपनीत नोकरीला आहे. सोबतच ती बॅंकेची नोकरी मिळविण्यासाठीही प्रयत्न करीत होती. त्यासाठी तिने एका वेबसाईटवर नोंदणी केली होती. नोंदणीच्या 3 दिवसानंतरच म्हणजे 8 जूनला आरोपींनी आत्रेईच्या मोबाईलवर मॅसेज केला. मॅसेज वाचल्यानंतर त्यात नमूद फोन क्रमांकावर तिने कॉल केला. पलिकडून बोलणाऱ्या आरोपीने तिला विचारले की, तुला कुठल्या बॅंकेत नोकरी हवी. आत्रेईने एचडीएफसी बॅंकेसाठी पसंती दिली. आरोपीने नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन देऊन तिला रेफरन्स कोडच्या नावावर दीपककुमारच्या पंजाब नॅशनल बॅंकेच्या खात्यात 1800 रुपये भरण्यास सांगितले. पैसे भरल्यानंतर आत्रेईला अनामिका नावाच्या महिलेने फोन करून तुझी मुलाखत होणार असल्याची माहिती दिली. तसेच मुलाखतीत कोणते प्रश्न विचारण्यात येतील याबाबत माहिती देण्यासाठी 8,500 रुपये भरायला लावले. यानंतर सुधांशू नावाच्या आरोपीने फोन करून आत्रेईची मुलाखत घेतली. मुलाखत घेतल्याच्या काही दिवसांनी अभिषेक नावाच्या आरोपीने तिला निवड झाल्याचे सांगितले. तसेच मुंबईत 45 दिवसांचे प्रशिक्षण असून त्यासाठी 15,500 रुपये शुल्क भरायला लावले. याच्या दोन दिवसांनी पुन्हा एनओसीच्या नावावर आरोपींनी आत्रेईकडून 22,500 रुपये जमा करून घेतले. हे सर्व पैसे दिपककुमारच्या खात्यात जमा करण्यात आले. यानंतर आत्रेईच्या ईमेलवर एचडीएफसी बॅंकेचे बनावट नियुक्ती पत्र पाठविण्यात आले.
नियुक्तीपत्र बनावट
काही दिवसांनी बॉण्डच्या नावावर पुन्हा 24,500 रुपयांची मागणी करण्यात आली. मात्र यावेळी आत्रेईला आरोपींवर संशय आला आणि तिने पैसे देण्यास नकार दिला. तेव्हापासून आरोपींनी तिच्याशी सर्व संपर्क तोडले. नियुक्ती पत्राबाबत चौकशी केली असता ते बनावट असल्याचे समोर आले. आरोपींनी आपली फसवणुक केल्याचे लक्षात येताच आत्रेईने पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी फसवणूक व आयटी ऍक्‍ट अंतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज सभा! विमानतळ ते होम मैदान अन्‌ शहरातील ‘हे' दोन मार्ग राहणार बंद; सभेसाठी कसे यायचे, वाहने कोठे लावायची? वाचा सविस्तर

Sakal Podcast : लातुरात कोण बाजी मारणार? ते चित्रपट निवडीबाबत मृणाल ठाकूरचा मोठा खुलासा

Nashik Fire Accident : ‘इलेक्ट्रिकल ऑडिट’कडे दूर्लक्षामुळे आगीला मिळते निमंत्रण; भीषण आगीत कोट्यवधींची मालमत्तेची राख

Priyanka Gandhi : मतांसाठी गांधी आडनावाचा वापर; मोहन यादव यांची प्रियांका गांधींवर टीका

Fact Check: मोदींच्या कोल्हापूरमधील सभेला विक्रमी गर्दी? Viral Photo महाराष्ट्र नव्हे नायजेरिया, चीनचे

SCROLL FOR NEXT