zudup
zudup 
विदर्भ

चल, पेट्रोल घेऊन येऊ... असे म्हणत नेले झुडपात; मग घडला हा प्रकार

सकाळवृत्तसेवा

वणी (जि. यवतमाळ) : मुकुटबन येथे काही दिवसांपूर्वी मिनाबाजार भरविण्यात आला होता. या मिनाबाजारात नागपूर येथील एका व्यावसायिकाने आपला झुला लावला होता. या झुल्याची देखभाल करण्यासाठी कळमना येथील रवी शिरमोरला (वय 25) ठेवले होते. परंतु लॉकडाउनमुळे रवीला कुठेही जाता येत नव्हते. ही बाब त्याने मालकाला सांगितली. संशयित सोहेलचे वडील झुलामालकाच्या ओळखीचे असल्याने रवीच्या खाण्यापिण्याच्या व्यवस्थेची जबाबदारी दिली होती. सोहेल शेख हा मुकुटबन येथे असलेल्या रवीला अन्नधान्याचा पुरवठा करीत होता. या दरम्यान सोहेल व रवी या दोघांत क्षुल्लक कारणावरून वाद झाला. या वादात रवीने सोहेलच्या कानशिलात हाणल्याची चर्चा आहे.

चोविस तासांत तरुणाच्या खुनाचा उलगडा
झालेला अपमान डोक्‍यात ठेवून सोहेलने रवीचा काटा काढण्याचे ठरविले. सदर घटना ही रेल्वे पोलिसांच्या अधिपत्यात येत असल्याने वर्धा येथील रेल्वे पोलिसांना पाचारण करण्यात आले. रेल्वे पोलिस विभागाचे सहायक पोलिस निरीक्षक नितीन वडते यांनी याप्रकरणी शुक्रवारी (ता.एक) गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. खूनप्रकरणी कायर येथील सोहेल शेख याला शनिवारी (ता.दोन) अटक केली. त्याला नागपूर येथील रेल्वे न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक नितीन वडते, गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक घनशाम बळडपे, दिलीप बांगरे, गजानन ढाले, राहुल येवले, विशाल मिश्रा, देवानंद मंडलवार, विनोद खोब्रागडे, गिरीश राऊत, रवींद्र सावजी, दीपक डोर्लीकर, सचिन आवारी यांनी केली.

मृतदेह कुजलेल्या स्थितीत 
नेहमीप्रमाणे 25 एप्रिलला अन्नधान्य पोहचविण्यास गेलेल्या सोहेलने रवी याला पेट्रोल आणण्याच्या बहाण्याने दुचाकीवर कायरला आणले व रेल्वे रुळानजीक असलेल्या झुडपी जंगलात नेवून त्याचा खून केला. मृतदेह तेथेच टाकून पळ काढला. तब्बल सात दिवसांनी कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. याबाबत शिरपूर पोलिसांना माहिती देण्यात आली. 

क्षुल्लक कारणातून झालेल्या वादाचा राग डोक्‍यात ठेवून मिनाबाजारातील झुल्यावर काम करणाऱ्या रवीचा खून करण्यात आला. ही घटना उघडकीस येताच चोविस तासात उलगडा करण्यात आला. कायर येथील संशयित मारेकऱ्याने तरुणाचा खून करून मृतदेह कायर येथील रेल्वे रुळालगत फेकला होता. सोहेल शेख, असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Best Saving Plan : दिवसाला फक्त २५० रुपये सेव्हिंग करा अन् २४ लाख रुपये मिळवा; लखपती बनवणारी सरकारी स्कीम

MI vs KKR IPL 2024 : IPL मधून मुंबई इंडियन्सचा पत्ता कट होणे टीम इंडियासाठी ठरणार गोड बातमी? जाणून घ्या कारण

Pension Department: पेन्शनधारकांना मोदी सरकारची मोठी भेट! नवीन ऑनलाइन पोर्टल केले लाँच; मिळणार 'या' सुविधा

Latest Marathi News Live Update: राहुल गांधींना 'शेहजादा' म्हणणाऱ्या पंतप्रधान मोदींवर प्रियंका गांधींचा हल्लाबोल

Indian Navy : अरबी समुद्रात पुन्हा भारतीय नौदलाची हवा, 20 पाकिस्तानींसाठी ठरले देवदूत

SCROLL FOR NEXT