Youth Attack on Shopkeeper 
विदर्भ

आगपेटी न दिल्याने डोक्‍यात भडकली आग मग केले हे...

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : सिगारेट पेटविण्यासाठी आगपेटी न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून सहा आरोपींनी दुकानदारावर गंभीर हल्ला केला. तसेच दुकानाची तोडफोडही केली. पोलिसांनी संकेतनगर निवासी राहुल ऊर्फ मोनू राजेंद्र वर्मा याच्या (वय 23) तक्रारीवरून गुन्हा नोंदविला आहे. आरोपींमध्ये जयशिव आणि त्याच्या पाच साथीदारांचा समावेश आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुलचे सुयोगनगरात मेट्रो बिर्याणी कॉर्नर आहे. बुधवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास जयशिव आणि त्याचे साथीदार दुकानात आले. त्यांनी राहुलला सिगारेट पिण्यासाठी आगपेटी मागितली. मात्र, राहुलने आगपेटी देण्यास नकार दिला. आरोपींनी राहुलला दुकानातून बाहेर बोलावले आणि शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली.

दरम्यान, जयशिवच्या साथीदारांनी रस्त्यावरील गट्टू उचलून दुकानावर फेकण्यास सुरुवात केली. फ्रीज, लाइट आणि फर्निचरची तोडफोड करून आरोपी पसार झाले. राहुलने घटनेची माहिती पोलिसांना दिली. अजनी पोलिस घटनास्थळावर पोहोचले. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. त्यांच्यावर आणखीही गुन्हे नोंद असल्याची माहिती मिळाली आहे. 

महिलेला जखमी करून लुटले

मानवशक्तीनगर, खरबी रोड निवासी सकीना कदीर शेख (वय 30) या छत्रपती चौकात एक कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये काम करतात. नेहमीप्रमाणे मंगळवारी रात्री 8.30 वाजताच्या सुमारास आपले काम आटोपून दुचाकीने घरी जात होत्या. रिंग रोडवरून दिघोरी पुलावर जाताना महेश बिअरबारसमोर दुचाकीस्वार दोन तरुण मागून आले. एका तरुणाने सकीना यांच्या डोक्‍यावर काहीतरी जड वस्तूने प्रहार केला. सकीना वेदनेतून सावरण्यापूर्वीच एका तरुणाने त्यांची हॅण्डबॅग हिसकली. यानंतर दोघेही फरार झाले. हॅण्डबॅगमध्ये रोकड, मोबाईल आणि कागदपत्रांसह 16 हजार रुपयांचा मुद्देमाल होता. रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांनी सकीनाला घटनेची माहिती दिली. यानंतर पोलिसांत तक्रार करण्यात आली. सक्करदरा पोलिस घटनास्थळावर पोहोचले. पोलिसांनी अज्ञात आरोपींवर गुन्हा नोंदवून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

Adul News : शिवण क्लास न लावल्याच्या रागातून विवाहिने संपविले जीवन; दीड वर्षाच्या मुलाचे मातृछत्र हरपले

Sansad Ratna Award 2026 : संसदेत ठाण्याचा बोलबाला! म्हस्के, शिंदेंना सलग दुसऱ्यांदा ‘संसदरत्न’

MPSC Marks Verification : एमपीएससी उमेदवारांसाठी मोठी बातमी! गुणपडताळणीसाठी अर्जाची संधी; जाणून घ्या अंतिम तारीख

SCROLL FOR NEXT