Tiger Attacked sakal
विदर्भ

रस्त्यावर दबा धरून बसलेल्या वाघाच्या हल्ल्यात युवक ठार

आपले काम आटोपून फुलझरी वरून डोणी येथे जात असताना रस्त्यावर दबा धरून बसलेल्या वाघाने युवकावर हल्ला करून ठार केल्याची घटना घडली.

सकाळ वृत्तसेवा

आपले काम आटोपून फुलझरी वरून डोणी येथे जात असताना रस्त्यावर दबा धरून बसलेल्या वाघाने युवकावर हल्ला करून ठार केल्याची घटना घडली.

मूल - आपले काम आटोपून फुलझरी वरून डोणी येथे जात असताना रस्त्यावर दबा धरून बसलेल्या वाघाने युवकावर (Youth) हल्ला (Tiger Attack) करून ठार (Death) केल्याची घटना कक्ष क्रं. 351 मध्ये घडली. भारत रामदास कोवे रा.डोणी वय 23 असे वाघाच्या हल्यात ठार झालेल्या युवकाचे नांव आहे. मूल तालुक्यातील व ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील डोणी येथील भारत रामदास कोवे वय 23 वर्षे हे कामानिमीत्त बाहेरगावी गेला होता. काम पुर्ण करून फुलझरी मार्गे डोणी येथे सायं. 7 वाजता दरम्यान जात असतांना दबा धरुन बसलेल्या वाघाने त्याच्यावर झडप घेत जागीच ठार केले.

सदर घटना मूल बफर क्षेत्रातील करवण येथील कक्ष क्रं. 351 मध्ये घडली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह उपजिल्हा रुग्णालय मूल येथे आणण्यात आले.वनपरिक्षेत्र अधिकारी नायगमकर,क्षेत्र सहाय्यक धुर्वे व इत्तर कर्मचारी हे घटना स्थळी जावून तपास केला. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान मृताच्या कुटुंबीयांस वनविभागाने 25 हजार रुपयांची मदत केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News: आमदार अमोल मिटकरीची विमान अपघातप्रकरणी चौकशीची मागणी; मुख्यमंत्री फडणवीसांचे सकारात्मक आश्वासन!

नवाजुद्दीन सिद्दीकीने राजपाल यादवला धोका दिला? मैत्रीत गद्दारी केल्याचा आरोप करत नेटकऱ्यांनी केल ट्रोल

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर परिक्षेत्रातील ८५ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या

Nanded News : नांदेडच्या महापौरपदी कविता मुळे; उपमहापौरपदी दीपकसिंह रावत यांची निवड

Mumbai -Kolhapur Train News : मुंबई -कोल्हापूर दरम्यान ६ विशेष गाड्या धावणार; रेल्वे प्रशासनाचा निर्णय

SCROLL FOR NEXT