bhandara accident 
विदर्भ

संचारबंदीत वीतभर पोटासाठी गेला कामावर, नंतर घडली ही घटना...

अभिजीत घोरमारे

भंडारा : वाटाण्याचा चुरणा करणाऱ्या थ्रेशरमध्ये दबून एका 27 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. पवनी तालुक्यातील वलनी येथे ही धक्कादायक घटना घडली. स्वप्निल भांडे (वय 27 वर्षे) रा. बेलाटी ता. लाखांदूर असे मृतक मजुराचे नाव आहे. देशभर संचारबंदी असताना पोटाची आग विझावी म्हणून स्वप्नील कामावर गेला, मात्र काळाला काही वेगळेच मंजूर होते.

शनिवारी दुपारच्या सुमारास वलणी येथील अरुण तिघरे यांच्या शेतात थ्रेशर मशीनच्या सहाय्याने वाटाणा काढण्याचे काम सुरू होते. दरम्यान, नजर चुकीने स्वप्नील भांडे याचा हात मशीनमध्ये ओढल्या गेला. यामुळे त्याचे डोके मशीनमध्ये फसून जबर मार लागला. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला.

वाटाणा पिकाची मळणी शेवटच्या टप्प्यात असताना ही दुर्देवी घटना घडली. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पवनी पोलिस घटनास्थळी पोहचले. नरेश देशमुख यांच्या मालकीचे हे मळणी यंत्र असून यावर 5 मजूर कामावर असून त्यापैकी स्वप्नील हा एक मजूर होता. त्याच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Farmer Relief: दिवाळीपूर्वी दीड कोटी शेतकऱ्यांना ५ हजार रुपये, अटी शर्तींसह मदत; कोण पात्र आणि अपात्र?

Chandgad Pumped Storage Project : चंदगडच्या धामापूर-कानूर भागात 7,519 कोटींचा जलविद्युत प्रकल्प; 390 हेक्टर जमीन अधिग्रहित होणार? 'असा' आहे मास्टर प्लॅन

Cyclone Arnava Update : बंगालच्या उपसागरात भयानक वादळ; ताशी 150 किमी वाऱ्याचा वेग, 'अर्णव' चक्रीवादळ यनमजवळ ओलांडणार किनारा, IMD कडून महत्त्वाची अपडेट

Marathi News Live Updates : चक्रीवादळ अर्नबचा आंध्र प्रदेशाला मोठा तडाखा, कोनसीमा जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस

आजचे राशिभविष्य - 28 ऑक्टोबर 2026

SCROLL FOR NEXT