file photo 
विदर्भ

दुचाकी अपघातात युवकाचा मृत्यू; दोघे जखमी

सकाळ वृत्तसेवा

अर्जुनी मोरगाव (गोंदिया) : भरधाव दुचाकी दिशादर्शक फलकाला आदळून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू तर, दोन जण जखमी झाले. ही घटना सोमवारी (ता. 23) रात्री साडेआठच्या सुमारास येथील तहसील कार्यालयाजवळ घडली. निखिल विनायक देशमुख (वय 25) असे मृताचे तर, सौरभ परिहार (वय 22) व इसाक शेख (वय 18) अशी जखमींची नावे आहेत. हे तिघेही गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा येथील रहिवासी आहेत.
निखिल, सौरभ व इसाक शेख हे तिघेही एमएच 33- झेड. 1312 क्रमांकाच्या दुचाकीने निमगावकडून अर्जुनी मोरगावकडे येत होते. भरधाव असलेली त्यांची दुचाकी स्त्याच्या कडेला असलेल्या दिशादर्शक फलकाला आदळली. तिघेही खाली कोसळून जखमी झाले. दरम्यान, तिघांनाही येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. उपचारादरम्यान निखिल देशमुख याचा मृत्यू झाला. सौरभ परिहार व इसाक शेख यांना उपचारासाठी इतरत्र हलविण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Iran Ceasefire : अमेरिका- इराण युद्धाविरामामुळे भारताला दिलासा; हॉर्मूझची सामुद्रधुनी खुली होताच एलपीजी पुरवठा होणार सुरळीत

Sports News: पलक-मुकेश नेलावल्ली यांची विश्वविक्रमासह सुवर्ण झेप; भारताचा अभिमान उंचावला

दिंडोरीवर पुन्हा शोककळा! चार शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू, तर झोक्याचा फास लागून एकाचा अंत

अमेरिकेची २ आठवडे युद्धबंदी! पाकिस्तानच्या पंतप्रधानांचं कॉपी पेस्ट ट्विट; स्क्रीप्ट ट्रम्पनी लिहून दिली?

Sports News: आशियाई बॅडमिंटन स्पर्धा;भारताचे दुहेरीत संमिश्र यश

SCROLL FOR NEXT