Youths from other state in Akola Khadki area 
विदर्भ

खडकी परिसरात परराज्यातील युवकांची 'खूराडे'

सकाळ वृत्तसेवा

अकोला  : कोरोनाला रोखण्यासाठी सामाजिक दुरावा निर्माण करण्याचे आवाहन केले जात असतानाच, खडकी परिसरात परराज्यातील शेकडो युवकांची  'खूराडे' सापडली आहेत. स्थानिक समाजसेवक व जिल्हा प्रशासनाने या ठिकाणी पाहणी केली असता, एका-एका फ्लॅटमध्ये ३० ते ४० जणांचा रहिवास आढळून आला असून, एका कंपनीत प्रशिक्षणार्थी असल्याचेही हे युवक-युवती सांगत आहेत.

जग सध्या कोरोना या महासंकटाला सामोरे जात आहे. भारतात हे संकट टाळण्यासाठी तसेच कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी केंद्र शासन, राज्य शासन तसेच स्थानिक प्रशासनाकडून शर्तीचे प्रयत्न केले जात आहेत. या प्रयत्नांमध्ये सर्वात महत्त्वाचा भाग म्हणून लोकांनी गर्दी टाळावी, एकमेकांपासून दूर राहावे म्हणजेच सामाजिक दुरावा निर्माण करावा, असे आवाहन केले जात आहे. संसर्ग टाळण्यासाठी बाहेर जिल्ह्यातील, राज्यातील व देशातील  प्रवाशांना येण्या-जाण्यावर रोख लावण्यात आली आहे. त्याच्यासाठी महत्त्वाचा निर्णय म्हणून वाहतूक सेवा सुद्धा बंद करण्यात आली आहे.  तरीसुद्धा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणामध्ये परराज्यातील लोकांचा रहिवास आढळून येत आहे. त्यामध्ये शहरातील खडकी परिसरामध्येच परराज्यातील हजारो युवक-युवतींचा रहिवास आढळून आला आहे.  याबाबत माहिती मिळताच शिवापूर येथील समाजिक कार्यकर्ते प्रल्हाद ढोरे, खडकी येथील सुरेंद्र हुंडीवाले, अजय शेळके, शंकरराव लंगोटे, नायब तहसीलदार श्री आसाराम, मंडळ अधिकारी आर.आय. शेटे आदींनी परिसरात पाहणी केली व परराज्यातील या युवकांना काही प्रमाणात अन्नधान्याचा पुरवठा सुद्धा केला. त्यानंतर एचडीओ, तहसीलदार व पोलिस अधिकाऱ्यांनी आरोग्य पथकासह परिसरात पाहणी केली. यावेळी खळबळजनक बाब म्हणजे एका-एका फ्लॅटमध्ये ३० ते ४० परराज्यातील युवकांचा रहिवास दिसून आला. केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे व आमदार रणधीर सावरकर यांनी सुद्धा या विषयाचा आढावा घेतला आणि परिसरातील सुरक्षेच्या दृष्टीने निर्देश देण्यात आले आहेत.

कंपनी आणि कामाचा पत्ता नाही
परराज्यातून कामासाठी तसेच प्रशिक्षणासाठी आणण्यात आलेले हे शेकडो युवक-युवती नेमक्या कोणत्या कंपनीत काम करतात आणि काय काम करतात, कशाचे प्रशिक्षण घेतात याबद्दल शहरात कोणालाही माहिती नाही. अधिकाऱ्यांनी तसेच स्थानिकांनी त्यांना याबद्दल विचारले असता, माहिती लपवण्याचा प्रयत्न या युवकांनी केला.

त्यांना रहिवासी केला वेगळा
कोरोनाची भीती लक्षात घेता, स्थानिक समाजिक कार्यकर्ते व जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी परराज्यातील या युवकांच्या रहिवासाची पाहणी करून, त्यांचे वेगळ्या फ्लॅटमध्ये विलगीकरण केले. यावेळी एका फ्लॅटमध्ये राहणाऱ्या २० ते ४० जणांना वेगवेगळे करून, एका-एका फ्लॅटमध्ये १० ते १२ जणांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली.

सर्वांची आरोग्य तपासणी
कोरोनाचे संकट लक्षात घेता, या सर्व युवकांची आरोग्य तपासणी सुध्दा करण्यात आली. त्यामध्ये काही जणांना चिकन पॉक्सची लागण दिसून आली तर, काहींना ताप, सर्दी, खोकला दिसून आल्याने त्यांची संशयित म्हणून तपासणी करण्यात आली. सुदैवाने त्यांना कोणतीही लागण नसल्याचे आढळून आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.

केली पोटापाण्याची सोय
स्थानिक समाजसेवक व जिल्हा प्रशासनाने खडकी परिसरात पाहणी केली असता, परराज्यातील शेकडो युवक व युवती येथे वास्तव्यास असून त्यांच्याकडे मुबलक अन्नधान्य साठा सुद्धा नसल्याचे दिसून आले. त्यामुळे स्थानिक समाजसेवक व जिल्हा प्रशासनाने त्यांना तांदूळ, डाळ व इतर अन्नधान्य साहित्य देऊन त्यांच्या पोटापाण्याची सोय केली.

फसवेगिरी केल्या जात असल्याचा संशय
अशी कोणती कंपनी आहे, जी हजारो युवक-युवतींना परराज्यातून महाराष्ट्रात आणत आहे? त्यांना कोणते प्रशिक्षण देत आहे, त्यांच्याकडून कोणते काम करून घेत आहे, हे उघड करायला तयार नाही. या युवकांना सुद्धा कोणालाही माहिती देऊ नका असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित कंपनी हे फसवेगिरी करणार्‍यांची टोळी  सुद्धा असू शकते, असा संशय व्यक्त करीत स्थानिकांकडून संबंधित कंपनीचा छडा लावून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : पर्रिकर न सांगता फिरायचे तसे फिरा, पुण्यातील महिलेनं सल्ला देताच अजित पवार म्हणाले, कोण पर्रिकर? नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

Heavy Rain: गेवराईत शनिवारी रात्री मुसळधार पाऊस; नदी नाल्यांचा पाणी ओसांडून अनेक गावांचा संपर्क तुटला, शेतकऱ्यांचे उत्पन्न धोक्यात

Kolhapur Crime : पहाटे चोरी करून रात्री थ्री स्टार हॉटेल मजा मारायची, लूटमारीचा चंगळवाद; CCTV मध्ये सापडताच पोलिसांनी केला कार्यक्रम

Mental Health: दर सात जणांपैकी एकाला मानसिक विकार; २०२१ मधील जगभरातील स्थिती, एक अब्ज जणांना त्रास, ‘डब्लूएचओ’ची माहिती

Sanjay Raut: अजित पवारांवर टीका करताना संजय राऊतांची जीभ घसरली... नको ते बोलले... थेट पाकिस्तानशी उल्लेख

SCROLL FOR NEXT