Zero Shadow Day: Sakal
विदर्भ

Zero Shadow Day: कारंजेकरांनी घेतला आज शून्य सावलीचा आनंद

Zero Shadow Day: सावलीचे शिक्षण अधिक सुलभ व्हावे व सावलीबद्दलचे अनेक गैरसमज दूर व्हावेत या उद्देशाने भारतीय खगोल मंडळाने(ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी ऑफ इंडिया) ''झीरो शॅडो डे'' नावाचे अ‍ॅप लाँच केले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Zero Shadow Day: सगळे आपली साथ सोडून जातील परंतु आपली सावली आपली साथ सोडत नाही असे अनेक जण म्हणतात. परंतु ही गोष्ट आज वाशीम जिल्ह्यासाठी खोटी ठरली आहे. कारण काही क्षणासाठी का होईना परंतु वाशीम जिल्ह्यातील वस्तूंची व व्यक्तींची सावली चक्क अदृश्य झाली.

आज कारंजेकरांनी व जिल्हा परिषद विद्यालय कामरगाव येथील विद्यार्थ्यांनी सावली हरवल्याचा अनुभव घेतला. एरव्ही सावलीकडे कुणी निरखून पाहत नाही. मात्र, ऊन वाढायला लागले की ऊन आणि सावल्यांचा खेळ नागरिक अनुभवतात. तंत्रज्ञानाचा वापर सुरू झाला तसे दैनंदिन जीवनातील सावलीचे महत्त्व कमी होत गेले. सध्या याची चर्चा होते ती शाळेत शिक्षण घेताना आणि शून्य सावली दिवसाच्यावेळी. सावलीचे शिक्षण अधिक सुलभ व्हावे व सावलीबद्दलचे अनेक गैरसमज दूर व्हावेत या उद्देशाने भारतीय खगोल मंडळाने(ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी ऑफ इंडिया) ''झीरो शॅडो डे'' नावाचे अ‍ॅप लाँच केले आहे.

रोज दुपारी बारा वाजता सूर्य डोक्यावर येतो आणि आपली सावली नाहीशी होते,असा अनेकांचा समज आहे.मात्र, प्रत्यक्षात तसे होत नाही. अशी स्थिती काही ठराविक दिवसांमध्येच निर्माण होते. यासाठी विविध खगोलीय गणितं जुळवून त्या तारखा ठरविल्या जातात. याबद्दल भारतीय खगोल मंडळ गेल्या काही वर्षांपासून देशपातळीवर जनजागृती मोहीम राबवत आहे.कारंजातील खगोलप्रेमी गोपाल खाडे हे गेले अनेक वर्षांपासून जि.प. विद्यालय कामरगांव व बाबरे कॉलनीत जनजागृती करत आहे.गोपाल खाडे यांनी आपल्या घरी अंगणात विशिष्ट पद्धतीने साहित्याची मांडणी करून सावली अदृश्य होत नाही तर ती त्या वस्तूच्या खाली गेल्याने दिसत नाही. गोपाल खाडे यांनी काचेवर या वस्तू ठेवल्या त्यामुळे त्या वस्तूंची सावली काचेच्या खाली पडलेली दिसली.

शून्य सावलीचा दिवस म्हणजे काय?

ज्या दिवशी सूर्याची क्रांती आपल्या गावाच्या अक्षांशाएव्हढी होते, त्या दिवशी दुपारी सूर्य डोक्यावर आल्यानंतर सावली आपल्या पायाखाली येते व अदृश्य होते. या दिवसाला ''शून्य सावलीचा दिवस''असे म्हणतात. आज कारंजात गोपाल खाडे, अशोकराव ताथोड,प्रा. किशोर वानखडे, निलेश राऊत, कौस्तुभ ताथोड,कनिष्का कडु,समर्थ कडु यांनी शून्य सावली दिवसाचा आनंद घेतला. झेड एस डी ॲप घेवुन खगोल प्रेमी याचा आनंद व माहिती घेऊ शकतात अशी माहिती गोपाल खाडे यांनी दिली.

मुख्याध्यापक प्रा.सुरेश राठोड व पर्यवेक्षक गोपाल खाडे यांचे मार्गदर्शनात जिल्हा परिषद विद्यालय कामरगावच्या अनेक विद्यार्थ्यांनी शून्य सावली दिवसाचा आनंद घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अर्शदीप सिंगने निवडले भारताचे सर्वोत्तम ५ बॉलर, पण बुमराहकडे दुर्लक्ष! प्लेइंग इलेव्हनमध्ये गंभीरला दिली जागा

Crime: पोटच्या मुलीसोबत नको ते केलं; रागाच्या भरात प्रेयसीनं प्रियकराचं गुप्तांग कापलं नंतर..., नेमकं काय घडलं?

Delhi Capitals: IPL 2027 आधी मुंबईच्या ४ युवा खेळाडूंना मोठी संधी; दिल्ली कॅपिटल्सच्या ट्रायल्समध्ये गांगुली-युवराज घेणार कसोटी!

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या कन्या शकुंतलाबाई सपताल यांचे निधन

भाजपचा बालेकिल्ला सर केला! प्रशांत किशोरांचा विजय कसा शक्य झाला? विजयामागची 5 मोठी कारणं

SCROLL FOR NEXT