The Zilla Parishad does not have its own building 
विदर्भ

काय म्हणाव याला? स्वतःच्या इमारती आहेत, पण नावावर नाही!

सुधीर भारती

अमरावती : जिल्ह्याचे मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेच्या मालकीच्या अनेक इमारती आजही जिल्हा परिषदेच्या नावे नाहीत. जिल्हा परिषदेचा सातबारा कोरा असून, जुन्या जनपदमध्येच लाखो रुपयांच्या प्रॉपर्टीची नोंद आहे. 

जिल्हा परिषदेच्या अधिनस्थ शहरातील सायंस्कोर शाळा व ऐतिहासिक सायंस्कोर मैदान, शासकीय गर्ल्स हायस्कूल, ऍकेडॅमिक हायस्कूल या महत्त्वाच्या शाळांचे संचालन जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग करतो. अनेक विद्यार्थी या शाळांमध्ये शिक्षण घेतात. मात्र, आजही या शाळांची नोंद जिल्हा परिषदेच्या खात्यामध्ये करण्यात आलेली नाही. या शाळांच्या नावापुढे जिल्हा परिषदेचे नाव असले तरी प्रत्यक्षात कागदपत्रांवर मात्र त्यांचा कुठलाही उल्लेख नाही. हीच स्थिती ग्रामीण भागाची आहे. 

जिल्हा परिषदेच्या अखत्यारित येणाऱ्या अनेक शाळांची नोंदच जिल्हा परिषदेच्या दप्तरी झालेली नाही. अनेक इमारती या ब्रिटिश कालावधीपासून असून, त्याची नोंद जनपदमध्ये आढळून येते. असे असले तरी शाळांपासून मिळणारे उत्पन्न मात्र जिल्हा परिषदेलाच मिळते. मागील काही महिन्यांपासून या प्रॉपर्टीची नोंद करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे. 

कार्यवाही सुरू 
बऱ्याच वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या अनेक इमारतींची नोंद जनपदमध्ये आहेत. जिल्हा परिषदेची प्रॉपर्टी नावावर करण्याची कार्यवाही सुरू आहे. 
- प्रशांत गावंडे, 
कार्यकारी अभियंता, बांधकाम

लवकरच प्रक्रिया पूर्ण होईल 
जिल्हा परिषदेच्या मालकीची नोंद करण्याच्या सूचना संबंधित विभागाला देण्यात येणार असून, लवकरच ही प्रक्रिया पूर्ण होईल. 
- बबलू देशमुख, 
अध्यक्ष, जिल्हा परिषद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT