संग्रहित छायाचित्र 
विदर्भ

अमरावती जिल्हा परिषदेत कशामुळे झाले "रणकंदन'

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : अतिशय निकडीच्या वेळीसुद्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना युरिया मिळत नसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. याच मुद्यावरून जिल्हा परिषद सदस्यांनी कृषी समितीच्या सभेत तसेच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कक्षात कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचा निषेध करीत बॅनर्स फडकाविले.

सदस्यांनी राजीनामेसुद्धा सोबत आणले होते, मात्र सीईओंच्या आश्‍वासनानंतर त्यांनी ते मागे घेतले. सध्या शेतकऱ्यांना युरियाची अतिशय आवश्‍यकता असून कृषिकेंद्रांतून युरियाच मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी समोर येताहेत. पेरणीनंतर युरियाची गरज असल्याने शेतकऱ्यांची चांगलीच अडचण होत आहे. कृषिकेंद्रचालक काही औषधी विकत घेतल्यानंतरच युरिया देत असल्याचा आरोप प्रकाश साबळे व प्रवीण तायडे यांनी केला. कृषी विभागाचे ढिसाळ नियोजनच याला कारणीभूत असल्याचा आरोप करीत सदस्यांनी सभागृहात निषेधाचे फलक दाखविले.

जिल्हा कृषी अधिकारी एल. बी. आडे यांनी दिलेल्या उत्तराने सदस्यांचे समाधान झाले नाही. जिल्ह्यासाठी 3545 मेट्रिक टन युरियाची गरज असताना प्रत्यक्षात मात्र 1200 मेट्रिक टनाचाच पुरवठा झाला आहे. जिल्ह्यातील 1600 ते 1800 कृषिकेंद्र चालकांना तो कशापद्धतीने वाटण्यात आला, असा प्रश्‍न प्रकाश साबळे व प्रवीण तायडे यांनी उपस्थित केला. कृषिकेंद्र चालकांकडून साठेबाजी करण्यात येत असल्याचा सदस्यांचा आरोप होता. कृषी विभागाचे नियोजन ढिसाळपणाचे असल्याचा आरोप सदस्यांनी केला. त्यानंतर सदस्यांसह सभापती विठ्ठल चव्हाण यांनी सभेतून थेट मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे दालन गाठले व तेथेसुद्धा फलक दाखविले. या वेळी युवक कॉंग्रेसचे ऐनुल्ला खान, समीर जवंजाळ, विजय धर्माळे, किरण महल्ले, सुनील सावळे, सोपान गुडधे, सोहेल पठाण, अमित पवार यांच्यासह अन्य उपस्थित होते.

साठेबाजांना "अभय'
एकीकडे शेतकऱ्यांना युरिया मिळत नसून दुसरीकडे कृषी विभागाचे अधिकारी मात्र साठेबाजांवर कुठलीही कारवाई करण्यास तयार नाहीत. कृषी विभागाचे अधिकारी शेतकऱ्यांच्या हिताचे की कंपन्यांचे?, असा प्रश्‍न प्रकाश साबळे यांनी उपस्थित केला.

संपादन - नरेश शेळके

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crop Insurance: दुष्काळ जाहीर झाला! पीक विम्यासाठी काय करावं? किती पैसे मिळणार? पाहा संपूर्ण गणित

Asian Games 2026: अरे आवाजsss कुणाचा... भारतीय पुरुष कबड्डी संघाने जिंकले नववे सुवर्णपदक; रोमहर्षक लढतीत इराणवर विजय

Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर पुन्हा अपघात! थांबलेल्या टँकरला धडकून कारचा चुराडा, एकाचा मृत्यू

Dattatray Bharne Drought Relief : महाराष्ट्रातील दुष्काळावर कृषीमंत्री दत्तात्रय भरणे काय म्हणाले? किती टप्प्यात मदत करणार?

पुण्यात पोलिसाने गोळी झाडून घेत आयुष्य संपवलं, PMPLच्या बस डेपोत आढळला मृतदेह; ३ दिवसांपासून होते बेपत्ता

SCROLL FOR NEXT