devendra fadnavis about  esakal
व्हिडिओ | Videos

Uddhav Thackeray: ‘औरंगजेब फॅन क्लबचे असल्याचं सिद्ध केलं’, उद्धव ठाकरेंना देवेंद्र फडणवीसांचे जोरदार प्रत्युत्तर

Devendra Fadnavis reply to uddhav thackeray: शिवसंकल्प मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांची अहमद शाह अब्दाली यांच्याशी तुलना केली होती. यावर देवेंद्र फडणवीस यांनी टोलेबाजी केली.

सकाळ वृत्तसेवा

शनिवारी पुण्यातील शिवसंकल्प मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या नेत्यांवर जोरदार टोलेबाजी केली. त्यावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे हे उदास व निराश व्यक्ती असल्याची प्रतिक्रिया दिली. उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांना अहमद शाह अब्दालीची उपमा दिली. ते म्हणाले, अहमद शाह अब्दालीचा राजकीय वंशज अमित शहा इकडे वळवळायला आला होता. तो पण शहा, हे पण शहा. आम्हाला हिंदुत्व शिकवतो. नवाज शरीफचा केक खाणारी औलाद तुमची अन् तुमच्याकडून आम्ही हिंदुत्व शिकायचं का?"

उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात शिवसैनिकांना "जशी औरंगजेबाची कबर बांधली, तशीच भाजपची राजकीय कबर या महाराष्ट्रात बांधा." असा आदेश दिला.

त्यावर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ते व नेत्यांच्या कडून टीका झाली. यावर प्रतिक्रिया देताना फडणवीसांनी उद्धव ठाकरे हे औरंगजेब फॅन क्लबचे सदस्य असल्याचं सिद्ध केले आहे असे जोरदार प्रत्युत्तर दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nirav Modi: नीरव मोदीसह इतरांवरील भ्रष्टाचाराचे आरोप रद्द, CBI न्यायालयाचा मोठा निर्णय

मी सेटवरून रडत घरी आलेले... निवेदिता सराफ यांनी सांगितला हिंदी मालिकेचा कटू अनुभव; म्हणाल्या, 'माझ्या आईने मला...'

Monsoon 2026: राज्यासाठी धोक्याची घंटा, यंदा पाऊस कमी होणार.. चिंता वाढली..

Latest Marathi News Live Update : ठाणेकरांवर पाणीसंकट गडद, धरणाच्या पाणीपातळीत घट

Pachod Water Issue : पाणीपुरवठा योजनांचा केवळ फार्स ..! तीन योजना राबवूनही थेरगाव येथे तहान भागविण्यासाठी जिवघेणी कसरत

SCROLL FOR NEXT