Pune rain news esakal
व्हिडिओ | Videos

Pune rain Update: पुणेकरांनो काळजी घ्या! मुठा नदीला पूर... येरवड्यातील ४००-५०० नागरिकांचे स्थलांतर

heavy rainfall pune: पुणे, पिंपरी-चिंचवड आणि आसपासच्या परिसरात भारतीय हवामान खात्याने पावसाचा रेडअलर्ट जारी केला आहे. खडकवासला भागात सध्या मुसळधार पाऊस होत असल्याने सध्या २७,००० क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

Sandip Kapde

पुण्यात पावसाचा जोर वाढला आहे. २-३ दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे धरणं भरली आहेत. खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने मुठा नदीला पूर आला आहे. त्यामुळे येरवडा भागातील ४००-५०० नागरिकांचे स्थलांतर करण्यात आलं आहे.

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि आसपासच्या परिसरात भारतीय हवामान खात्याने पावसाचा रेडअलर्ट जारी केला आहे. खडकवासला भागात सध्या मुसळधार पाऊस होत असल्याने सध्या २७,००० क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरु आहे. नागरिकांनी सुद्धा सतर्क राहून काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे जिल्ह्यातील धोकादायक पूर रेषेच्या आत राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याचे आदेश दिले आहेत. पूर परिस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांच्या सुरक्षेसाठी मुख्यमंत्री शिंदे यांचे विशेष लक्ष असून त्यांनी पुणे जिल्हाधिकारी, पुणे शहर महापालिका आयुक्त आणि आपतकालीन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी फोनवरून चर्चा केली.

मुख्यमंत्री शिंदे यांनी ब्लू लाईनच्या आत राहणाऱ्या सर्व नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, स्थलांतरीत नागरिकांसाठी दोन्ही वेळचे जेवण, राहण्याची सोय आणि त्यांना लागणारी मदत उपलब्ध करून देण्याचे आदेशही मुख्यमंत्री शिंदे यांनी सर्व अधिकाऱ्यांना दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT