chandrakant patil yashomati thakur esakal
व्हिडिओ | Videos

Chandrakant Patil: "मी आमदार की चपराशी ?" चंद्रकांत पाटलांच्या जिल्हा नियोजन समिती बैठकीत गोंधळ, यशोमती ठाकूर झाल्या आक्रमक

Yashomati Thakur: बैठकीला खासदार बळवंत वानखडे, आमदार सुलभा खोडके, यशोमती ठाकूर, प्रताप अडसड, बच्चू कडू, माजी पालकमंत्री प्रवीण पोटे, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, मनपा आयुक्त सचिन कलंत्रे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा, जिल्हा नियोजन अधिकारी श्री. म्हस्के व अन्य उपस्थित होते.

सकाळ वृत्तसेवा

जिल्हा नियोजन समितीच्या रविवारी झालेल्या बैठकीत चांगलीच खडाजंगी झाली. जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांकडून आमदारांचा निधी रोखून धरण्यात आल्याचा आरोप करीत आमदारांनी नियोजन अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी लावून धरली. तर लाडकी बहीण योजनेच्या समितीमध्ये महिला आमदाराला स्थान न दिल्याने आमदार यशोमती ठाकूर यांनी संताप व्यक्त केला. आमदार रवी राणा व बच्चू कडू यांच्यातील खडाजंगीने सभागृहातील वातावरण चांगलेच तापले होते.

पालकमंत्री तथा जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन भवनाच्या सभागृहात बैठकीला प्रारंभ होताच आमदार सुलभाताई खोडके यांनी जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांच्या कार्यशैलीवर ताशेरे ओढले. शासनाकडून ५० कोटींचा आमदार निधी मंजूर झाला असतानाही नियोजन अधिकाऱ्यांनी तो निधी आपल्याला उपलब्ध करून दिला नाही, असा आरोप करीत त्यांच्या निलंबनाची मागणी केली. याशिवाय खासदार बळवंत वानखडे, आमदार बच्चू कडू, अॅड. यशोमती ठाकूर यांनीसुद्धा संताप व्यक्त केला. मात्र लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता आणि त्यानंतरचे विधिमंडळाचे अधिवेशन, यामुळे हा निधी वितरित होण्यास उशिरा झाला, त्यामुळे तो आता वितरित झाल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.

मात्र तरीसुद्धा सदस्यांचे समाधान न झाल्याने जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांवरील कारवाईचा प्रस्ताव शासनाला पाठविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर आमदार रवी राणा यांनी चिखलदरा तालुक्यातील दहेंद्री ढाणा गावात दूषित पाण्यामुळे अनेक ग्रामस्थांना साथीचा आजार झाला असून एका युवकाचा मृत्यू झाल्याप्रकरणी संबंधित ग्रामसेवकाला निलंबित करण्याची मागणी रेटून धरली.

अखेर संबंधित ग्रामसेवकाला सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णय झाला.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी तालुकास्तरावर गठित समितीवर महिला आमदार म्हणून आपली साधी नोंदही नसल्याबद्दल यशोमती ठाकूर चांगल्याच आक्रमक झाल्या. विरोधी पक्षाच्या आमदारांना भेदभावपूर्ण वागणूक दिली जात असल्याचा त्यांनी आरोप केला.

बैठकीला खासदार बळवंत वानखडे, आमदार सुलभा खोडके, यशोमती ठाकूर, प्रताप अडसड, बच्चू कडू, माजी पालकमंत्री प्रवीण पोटे, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, मनपा आयुक्त सचिन कलंत्रे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा, जिल्हा नियोजन अधिकारी श्री. म्हस्के व अन्य उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Voter List: राज्यात एक कोटी मतदार वगळणार ? 'एसआयआर'मध्ये मुंबई, ठाणे, पुण्यात सर्वाधिक मतदार बाद होण्याचा अंदाज!

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात सलग दोन दिवस घसरण, आजचे भाव काय?

१३५च्या स्पीडनं स्विफ्टची ट्रकला मागून धडक, अख्खं कुटुंब संपलं; पाच जणांचा जागीच मृत्यू

Bay of Bengal Low Pressure Area : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भाला पाऊस; हवामान विभागाचा अंदाज

बुमराला अचानक विश्रांती का? अफगाणिस्तान मालिकेपूर्वी BCCI चा मोठा मास्टरप्लॅन समोर!

SCROLL FOR NEXT