व्हायरल-सत्य

Fact Check: नरसिंह राव यांना 'भारतरत्न' प्रदान करताना मल्लिकार्जून खर्गे यांनी टाळ्या वाजवल्या नाहीत हा दावा खोटा

वृत्तसंस्था

Created By: Boom

Translated By : सकाळ डिजिटल टीम

काही दिवसांपूर्वी 2024 चा भारतरत्न पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला. यातील एक फोटो शेअर करत, सोशल मीडिया युजर्सनी दावा केला आहे की, माजी पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव यांच्या मुलाने त्यांच्या दिवंगत वडिलांच्या वतीने भारतरत्न स्वीकारला तेव्हा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी टाळ्याही वाजवल्या नाहीत.

मात्र, बूमने केलेल्या तपासणीमध्ये असे आढळले की, खर्गे यांच्याबाबत सोशल मीडियावर केले जात असलेले दावे खोटे आहेत.

दावा

माजी पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव यांना 30 मार्च 2024 रोजी मरणोत्तर भारतरत्न प्रदान करण्यात आला. त्यांचा मुलगा प्रभाकर राव यांनी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून हा पुरस्कार स्वीकारला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर या समारंभाला उपस्थित होते.

प्रभाकर राव राष्ट्रपतींकडून पुरस्कार स्वीकारताना मोदी, अमित शहांसह इतर पाहुणे टाळ्या वाजवताना दिसत असल्याचा फोटो ऑनलाइन व्हायरल झाला आहे.

हा फोटो शेअर करत काही युजर्नी दावा केला आहे की, "पीव्ही नरसिंह राव यांचा मुलगा पुरस्कार स्वीकारताना पहिल्या रांगेतील टाळ्या न वाजवणारी एकमेव व्यक्ती म्हणजे मल्लिकार्जुन खर्गे. यालाच कुटुंबाची निष्ठा म्हणतात."

'एक्स'वरील (Twitter) पोस्टचं Archieve Version येथे पाहता येईल.

Fake X, Post About Mallikarjun Kharge

फेसबुकवर आणखी एका युजरने लिहिले की, "काँग्रेसचे खर्गे टाळ्या वाजवत नाहीत. यावरून काँग्रेस नेत्यांची पीव्हीबद्दलची मानसिकता दिसून येते."

'फेसबुक'वरील (Facebook) पोस्टचं Archieve Version येथे पाहता येईल.

Fake Facebook, Post About Mallikarjun Kharge

सत्य

या फोटोबाबत बूमने केलेल्या तपासणीमध्ये आढळले की, खर्गे यांनी माजी पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव यांचे पुत्र प्रभाकर राव पुरस्कार स्वीकारताना टाळा वाजवल्या होत्या. मात्र, सोशल मीडिया युजर्सनी खर्गेंनी टाळ्या वाजवून झाल्यानंतरचा फोटो व्हायरल करत खोटा दावा केला आहे.

हे सत्य शोधण्यासाठी बूमने भारतरत्न पुरस्कार सोहळ्याचा संपूर्ण व्हिडिओसाठी YouTube वर कीवर्डसह शोधला आणि 30 मार्च 2024 रोजी भारताच्या राष्ट्रपतींच्या व्हेरिफाईड हँडलद्वारे शेअर केलेला लाइव्ह स्ट्रीम आढळला.

यावेळी व्हिडिओ चालू झाल्यानंतर 1:58 मिनिटांनी, पुरस्कारासाठी पीव्ही नरसिंह राव यांचे नाव घोषित झाले. यानंतर, 2:07 मिनिटांनी, मल्लिकार्जुन खर्गे कार्यक्रमातील इतर पाहुण्यांसह टाळ्या वाजवताना दिसत आहेत.

2:13 मिनिटांनी, प्रभाकर राव आणि खर्गे एकाच फ्रेममध्ये दिसतात आणि नंतर अजूनही पीव्ही नरसिंह राव यांच्यासाठी टाळ्या वाजवत आहेत.

निष्कर्ष

या प्रकरणी कले जात असलेले सर्व दावे तपासल्यानंतर असे अढळले की, सोशल मीडियावर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांच्याबाबत केला जात असलेला दावा खोटा आहे.

काँग्रेस अध्यक्ष खर्गे यांनी माजी पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव यांचे भारतरत्न पुरस्कार सोहळ्यासाठी नाव पुकारल्यानंतर टाळ्या वाजवल्या होत्या हे अनेक पुराव्यांच्या आधारे स्पष्ट झाले आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असणारा दावा खोटा असून, यावर विश्वास ठेऊ नये. तसेच तो पुढे शेअर करु नये.

'बूम' या संकेतस्थळाने याबाबतचा रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. शक्ति कलेक्टिव्हचा भाग म्हणून 'सकाळ'ने याचं भाषांतर केलेलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election Exit Poll 2024: 'हा तर सरकारी एक्झिट पोल...', निकालांचा कल हाती आल्यानंतर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया

Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : एक्झिट पोलमध्ये देशात तिसऱ्यांदा NDA ची सत्ता; INDIA आघाडीला किती जागा मिळणार?

Loksabha election 2024 Exit Poll : एकच पठ्ठ्या म्हणतोय मोदी चारशेपार होतील! तेही घटकपक्षांना धरुन; काय आहे एक्झिट पोलची आकडेवारी?

Mumbai News : महिला प्रवाशांची रेल्वेला साथ; सुट्टी किंवा वर्क फ्रॉम होममुळे महिला डब्यात तुरळक गर्दी

OpenAI Robotics Comeback : लवकरच तुमच्या भेटीला येतोय 'AI रोबोट' ; प्रगत तंत्रज्ञान घेऊन OpenAIचं पुन्हा पदार्पण

SCROLL FOR NEXT