China Bridge Fact Check
China Bridge Fact Check 
व्हायरल-सत्य

Fact Check : चीनमधला पूल मुंबईचा सांगून '४०० पार' चा दावा; फोटो व्हायरल

वृत्तसंस्था

Created By: PTI Fact check Desk

Translated By : Sakal Digital Team

मुंबई : मध्य समुद्रात बांधलेल्या पुलाचा फोटो सध्या सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर चांगलाच व्हायरल होत आहे. हा फोटो मुंबईतील असल्याचा दावा केला जात आहे. लोकसभा निवडणुकीच्या २०२४ च्या दुसऱ्या टप्प्याच्या मतदानापूर्वी भाजपच्या ‘४०० पार’ अशा घोषणा देत हा फोटो शेअर केला जात आहे.

'पीटीआय फॅक्ट चेक डेस्क' ने तपास केला आणि व्हायरल दावा खोटा असल्याचे आढळले. वास्तविक, हे चित्र चीनच्या शेंडाँग प्रांतातील शेडोंग Qingdao Jiaozhou Bay Bridge चे आहे, जो मुंबईमधील नव्याने बांधला गेलेला हायवे म्हणून शेअर केला जात आहे. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात शुक्रवारी २६ एप्रिल रोजी १३ राज्यांतील ८८ जागांवर मतदान होणार आहे.

दावा काय केला आहे?

दावा १

गुंजन खेरा नावाच्या फेसबुक युजरने २४ एप्रिलला हा व्हायरल फोटो पोस्ट करत लिहिले की, “हा अमेरिका किंवा चीन नाही, हा मुंबईचा हायवे आहे, जा फिरून या, अशा पद्धतीनेच ४०० पार येणार आहेत.”

दावा २

देसी हाथोडा नावाच्या एका एक्स (पूर्वीचे ट्विटर) वापरकर्त्याने व्हायरल फोटोसोबत लिहिले आहे की, “हे अमेरिका किंवा चीन नाही. मुंबई, भारत... विचारपूर्वक मतदान करा.."

एक ना दोन अशा प्रकारचे दावे करणाऱ्या अनेक पोस्ट वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झालेल्या दिसत आहेत.

viral photo of china bridge

तथ्य तपासणीत काय आढळले?

पुरावा १

व्हायरल दाव्यातील तथ्य जाणून घेण्यासाठी, 'पीटीआय फॅक्ट चेक डेस्क' ने आधी 'Google लेन्स रिव्हर्स इमेज सर्च' या 'टूल' च्या मदतीने दाव्यातील 'इमेज सर्च' केल्या. त्यावेळी त्यांना हा फोटो 'पोस्टकार्ड न्यूज' नावाच्या थ्रेड खात्यावर सापडले. पोस्टच्या कमेंटमध्ये अनेक युजर्सने हा फोटो चीनच्या 'जिओझोउ बे ब्रिज' चा असल्याचे सांगितले आहे.

पुरावा २

'सिव्हिल इंजिनीअरिंग डिस्कव्हरीज' नावाच्या पेजने हाच दावा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर फोटो पोस्ट करत केला होता. त्यांच्या कमेंटमध्येदेखील युजर्सने हा फोटो चीनच्या शेंडोंग येथे असलेल्या 'जिओझोउ बे ब्रिजचा' असल्याचे सांगितले आहे.

पुरावा ३

'पीटीआय डेस्क' ने संबंधित कीवर्डच्या मदतीने Google ओपन सर्च केले. यावेळी, त्यांना vidopedia.ir आणि vk.com नावाच्या वेबसाइटवर चित्रात दिसणाऱ्या पुलाशी साधर्म्य असलेली एक व्हिडिओ क्लिप सापडली. क्लिपच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, "चीन समुद्राच्या मध्यभागी रस्ता आणि महामार्गाची उभारणी!"

येथे क्लिक करून व्हिडिओ लिंक पहा.

पुरावा ४

याशिवाय, त्यांना चीनच्या नॅशनल ब्रॉडकास्टर सीसीटीव्हीच्या फेसबुक पेजवर या पुलाशी संबंधित एक व्हिडिओही सापडला. त्याच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, हा पूर्व चीनच्या शेंडोंग प्रांतातील 'जिओझोउ बे ब्रिजचा' व्हिडिओ आहे. पुलाची एकूण लांबी ४१ किलोमीटर असून त्यातील २८ किलोमीटर समुद्रावर हा पूल बांधण्यात आला आहे.

येथे क्लिक करून पूर्ण व्हिडिओ पहा.

डेस्कने व्हिडिओमध्ये दिसलेल्या पुलाची तुलना व्हायरल चित्रात दिसलेल्या पुलाशी केली आहे. ज्याचा स्क्रीनशॉट पहा आणि तुम्हीच काय ते ठरवा.

पुरावा ५

३१ मार्च २०२० रोजी 'चायना डेली' च्या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, 'जिओझोउ' खाडीच्या दोन्ही बाजूंच्या वेगाने विकसित होत असलेल्या औद्योगिक क्षेत्रांमध्ये कनेक्टिव्हिटी देण्यासाठी हा पूल बांधण्यात आला आहे. हा पूल ३० जून २०११ रोजी सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आला आहे.

येथे क्लिक करून संपूर्ण अहवाल वाचा.

पुरावा ६

तपासादरम्यान डेस्कला असेही कळले की, यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईतील एका पुलाचे उद्घाटन केले होते, परंतु सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या पुलाचे छायाचित्र या पुलापेक्षा पूर्णपणे वेगळे आहे.

माध्यमांनी केलेल्या वार्तांकनानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वर्षी जानेवारीमध्ये मुंबईत 'अटल बिहारी वाजपेयी सेवारी-न्हावा शेवा अटल सेतू' चे उद्घाटन केले होते. डिसेंबर २०१६ मध्ये पंतप्रधानांनी त्याची पायाभरणी केली.

येथे क्लिक करून संपूर्ण अहवाल वाचा.

पीटीआय ने म्हंटले की, आमच्या आतापर्यंतच्या तपासातून हे स्पष्ट झाले आहे की, युजर्स चीनच्या शानडोंग प्रांतातील 'शानडोंग जिओझोउ बे ब्रिज' चा फोटो मुंबईतील असल्याचा दावा करून बनावट दाव्यासह सोशल मीडियावर शेअर करत आहेत.

निष्कर्ष

सोशल मीडियावर एका पुलाचा फोटो मुंबईचा असल्याचे शेअर केले जात आहे. 'पीटीआय फॅक्ट चेक डेस्क' ने तपास केला आणि व्हायरल दावा खोटा असल्याचे आढळले. तपासात डेस्कला हा फोटो चीनचा असल्याचे आढळले. युजर्स चीनच्या 'शेडोंग जिओझोउ बे ब्रिज' चा फोटो खोट्या दाव्यासह शेअर करत आहेत.

'PTI Fact check Desk' या संकेतस्थळाने याबाबतचा रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. शक्ति कलेक्टिव्हचा भाग म्हणून 'सकाळ'ने याचं भाषांतर केलेलं आहे.

---------------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Loksabha: प्रशासनाचा भोंगळ कारभार, मतदार यादीत नाव नसल्याने मतदार हैराण

HSC Result 2024 : उद्या लागणार बारावीचा निकाल, गुणपडताळणी कशी करायची ? एका क्लिक मध्ये जाणून घ्या

Google Map Address Update : गुगल मॅपवर पत्ता बदलणे आता तुमच्या हातात ; फॉलो करा 'या' ट्रिक्स

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: पवईतील हिरानंदानी मतदार केंद्रावर दोन तासांपासून मतदारांच्या रांगा

Kolhapur Lok Sabha : लोकसभा निकालाची उत्सुकता शिगेला; कार्यकर्त्यांत लागल्या पैजा, सट्टाबाजारातही उलाढाल जोरात

SCROLL FOR NEXT