MDMK vaiko
MDMK vaiko SOCIAL MEDIA
व्हायरल-सत्य

Fact Check: ANI च्या व्हिडिओमध्ये 'एमडीएमके' चे संस्थापक वायको यांनी फक्त काँग्रेसवर टीका केली नाही, अर्धवट व्हिडिओ होतोय व्हायरल

वृत्तसंस्था

Created By: News Meter

Translated By : Sakal Digital Team

सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चुकीची किंवा अर्धवट माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल केली जात असल्याचे दिसून येत आहे.. त्याचाच प्रकार तामिळनाडूमध्ये दिसून आला आहे..

व्हायरल व्हिडीओ काय आहे?

सध्या मरुमलार्ची द्रविड मुनेत्र कळघम (मडीएमके) चे या तामिळनाडू आणि पुद्दूचेरीमधील राजकीय पक्षाचे संस्थापक वायको यांनी वक्तव्य केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी काँग्रेस पक्षाने 'कच्चथीवू बेट' प्रकरणात विश्वासघात केला आहे असे वक्तव्य केले आहे. काँग्रेसविरोधी केलेल्या वक्तव्याच्या निवडणूक प्रचारादरम्यान सोशल मीडियावर वापर केला जात आहे.

'कच्चथीवू बेट' हे प्रकरण काय आहे?

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने कच्चथीवू वादाला पुन्हा वाचा फोडली. त्यांनी असा आरोप केला की काँग्रेस नेहरू आणि नंतर इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वात श्रीलंकेच्या दबावाखाली भारताने हे बेट सोडले. कच्चथीवू हे भारत आणि श्रीलंका या दोन देशांच्यामध्ये वसलेले एक लहान निर्जन बेट आहे. दोन्ही देशांनी १९२१ पासून या बेटावर आपला हक्क सांगितला आहे.

तामिळनाडूतील राजकारण काय?

वायको हे MDMK पक्षाचे संस्थापक आहेत जे तामिळनाडू राज्यातील 'द्रविड मुन्नेत्र कळघम (DMK) या सत्ताधारी पक्षाचे मित्रपक्ष आहेत. आणि सर्व भाजप विरोधी पक्षांनी एकत्र येत स्थापन केलेल्या 'इंडिया आघाडी' चे ते सदस्य आहेत. त्यामुळे अर्धवट व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून असा संदेश जाऊ शकतो की, मित्रपक्षांचाच काँग्रेसला घरचा आहेर.

हा व्हिडीओ आला कुठून?

हा व्हिडीओ सुरुवातीला ANI या वृत्तसंस्थेने (ANI Archive) त्यांच्या X या सोशल मीडिया पेजवर ३ एप्रिल रोजी पोस्ट केला होता. त्यानंतर सोशल मीडियामध्ये तो चांगलाच लोकप्रिय झाला. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सी.आर.केसवन यांनी या व्हिडिओचा प्रचार केला, ज्यामुळे कच्चथीवू बेटाविषयी काँग्रेसवर होणाऱ्या कथित आरोपांवर वायको यांनीही नाराजी व्यक्त केली या लोकभावनेला बळ मिळाले.

फेसबुकवर काय प्रचार केला गेला?

अनेक फेसबुक युजरने या व्हिडिओचा आधार घेत 'काँग्रेसने कच्चथीवू बेट प्रकरणात तामिळनाडूचा विश्वासघात केला' असे कॅप्शन देत व्हिडीओ व्हायरल केला.

'फेसबुक' वरील पोस्टचं Archive Version येथे पाहता येईल.

Vaiko viral video

संपूर्ण व्हिडिओमध्ये काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांवर टीका

'न्यूज मीटर' ने केलेल्या तथ्य तपासणीत (Fact Check) मध्ये वायकू यांनी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी तामिळनाडूचा विश्वासघात केला आहे असा आरोप केला असल्याचे आढळून आले. जो व्हायरल व्हिडिओमध्ये मात्र केवळ काँग्रेसने विश्वासघात केला असा दावा केला गेला आहे.

'न्यूज मीटर' ने याच्या 'कीवर्ड' द्वारे शोध घेतला असता त्यांना 'सन न्यूज' या तमिळ मीडिया ने 3 एप्रिल रोजी पोस्ट केलेल्या व्हिडिओ फुटेज मिळाले. यामध्ये, वायको स्पष्टपणे म्हणत आहेत की, “काँग्रेसने त्या वेळी प्रत्येक आघाडीवर तामिळनाडूचा विश्वासघात केला. “मागील दहा वर्षे नरेंद्र मोदी यांनाही मुदत दिली होती मात्र ते देशद्रोही आहेत. त्यांनी तामिळनाडूचा विश्वासघात केला. भारताचा विश्वासघात केला आणि श्रीलंकेचाही विश्वासघात केला." (Watch full video of "Vaiko', the founder of 'MDMK' did not only criticize the Congress)

'न्यूज मीटर' ने याबाबत टाइम्स ऑफ इंडियाच्या च्या ४ एप्रिल २०२४ च्या बातमीचाही दाखला दिला आहे. ते म्हणतात, या वृत्तानुसार " दक्षिण चेन्नईमध्ये द्रमुक नेते थामिझाची थंगापांडियन यांच्यासाठी प्रचार करत असताना, ANI ने कच्चथीवूबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना वायको यांनी काँग्रेस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या दोघांवर तामिळनाडूचा विश्वासघात केल्याचा आरोप केला."

तामिळनाडूतील वृत्त वाहिनी, 'पुथिया थलाईमुराई' टीव्हीने ३ एप्रिल रोजी वायको यांच्या वक्तव्याचा व्हिडीओ YouTube वर अपलोड केला. या संपूर्ण व्हिडिओमध्ये वायको यांनी काँग्रेस आणि पंतप्रधान या दोघांवर आरोप केल्याचे समोर येत आहे.

निष्कर्ष :

याबाबत 'न्यूज मीटर' ने म्हंटले आहे की, आम्ही असा निष्कर्ष काढतो की MDMK नेते वायको यांचा व्हायरल व्हिडिओ 'क्लिप' केला गेला आहे, ज्यामध्ये काँग्रेस आणि पंतप्रधान मोदी या दोघांवर केलेल्या टीकेचा पूर्ण संदर्भ नाही. त्यामुळे हा व्हिडिओ दिशाभूल करणारा आहे.

'न्यूजमीटर' या संकेतस्थळाने याबाबतचा रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. शक्ति कलेक्टिव्हचा भाग म्हणून 'सकाळ'ने याचं भाषांतर केलेलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी 8 टक्के मतदान

Akshay Kumar: खिलाडी अक्षय कुमारनं भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर पहिल्यांदाच केलं मतदान; म्हणाला, "माझा भारत देश हा..."

Latest Marathi Live News Update: सुनील राऊत पोलिसांवर भडकले

PM Modi : मतपेढीच्या तुष्टीकरणासाठी संस्थांना धमक्या; पंतप्रधानांची ममतांवर टीका

Standing Problems: तुम्हीही जास्त वेळ उभे राहत असाल तर वाढू शकतात 'या' समस्या

SCROLL FOR NEXT