Fact Check |Fake Video| CM Siddaramaiah Esakal
व्हायरल-सत्य

Fact Check: "पुढील आयुष्यात मुस्लिम म्हणून जन्म घ्यायचा आहे," कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा फेक व्हिडिओ व्हायरल

Karnataka CM Siddaramaiah: कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते कन्नड भाषेत काहीतरी बोलताना ऐकू येत आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Fake Video Of Karnataka CM Siddaramaiah:

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते कन्नड भाषेत काहीतरी बोलताना ऐकू येत आहेत.

मात्र, सिद्धरामय्या यांना पुढील आयुष्यात मुस्लिम म्हणून जन्म घ्यायचा आहे, असे ते या व्हिडिओमध्ये म्हणत असल्याचा दावा करत सोशल मीडिया यूजर्स तो व्हायरल करत आहेत.

दावा

याबाबत आम्ही अधिक माहिती घेतली असता त्यातून असे, समोर आले की, हा व्हायरल व्हिडिओ 10 मार्च 2024 रोजीचा आहे.

सिद्धरामय्या मंड्यातील एका सार्वजनिक सभेत भाषण करत होते. ज्यामध्ये ते जेडीएस प्रमुख एचडी देवेगौडा यांच्यावर टीका करत होते आणि त्यांच्या जुन्या विधानाचा हवाला देत होते.

सिद्धरामय्या एचडी देवेगौडा यांच्या जुन्या विधानाबद्दल म्हणतात की, "ते म्हणायचे की मला (देवेगौडा) मुस्लिम म्हणून पुनर्जन्म घ्यायचा आहे."

सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ ऋषी बागरी (@rishibagree) नावाच्या युजरने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर शेअर केला आहे. याबरोबर ऋषी बागरीने कॅप्शनमध्ये लिहिले की, " सिद्धरामय्या यांना पुढील जन्मी मुस्लिम म्हणून जन्म घ्यायचा आहे."

सत्य

आम्ही कन्नड भाषेतील जाणकारांकडून या व्हिडिओमध्ये सिद्धरामय्या काय म्हणत आहेत याची तपासणी केली. आणि आढळले की व्हायरल व्हिडिओ 10 मार्च 2024 चा आहे, जेव्हा सिद्धरामय्या मंड्यामध्ये एका सार्वजनिक सभेला संबोधित करत होते.

व्हायरल व्हिडिओ हा या भाषणाचा एक भाग आहे, ज्यामध्ये ते देवेगौडा यांच्यावर टीका करतात आणि त्यांच्या जुन्या विधानाबद्दल म्हणतात की, "मला (देवेगौडा) मुस्लिम म्हणून पुनर्जन्म घ्यायचे आहे."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT