Created By : Logically Facts
Translated By: Sakal Digital Team
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्माचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे. या व्हिडिओत नुपूर शर्मा भगवा स्कार्फ घालून आणि ध्वज घेऊन एका रॅलीत सहभागी झाल्याचे दिसत आहे. व्हिडिओसह दावा केला जात आहे की नुपूर शर्मा दिल्ली निवडणुकीत भाजपच्या प्रचारासाठी उतरल्या आहेत.
व्हिडिओसह सोशल मीडियावर पोस्ट केल्या जात आहेत की, "हिंदू शेरनी नुपूर शर्मा दिल्ली विधानसभा निवडणुकीत सहभागी झाली आहे."
दावा केला जात आहे की त्या भाजपच्या भावी मुख्यमंत्र्याचा चेहरा आहेत.
व्हिडिओची तपासणी केली असता यामध्ये "आज तक" आणि "एबीपी न्यूज" यांच्या जानेवारी 2024 मधील अहवालात तोच व्हिडिओ सापडला.
(archieve इथे पाहा)
हा व्हिडिओ दिल्लीतील 'जन जागरण यात्रा' कार्यक्रमाचा असून, अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित केला होता.
14 जानेवारी 2024 रोजी एबीपी न्यूजने (archieve इथे पाहा) आपल्या यूट्यूब चॅनेलवर हा व्हिडिओ शेअर केला होता. त्यात हा व्हिडिओ दिल्ली निवडणुकीशी संबंधित नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते.
नवभारत टाइम्स, लाइव्ह हिंदुस्तान, आणि आज तकच्या रिपोर्ट्समध्ये देखील या व्हिडिओचा उल्लेख आहे. त्यात सांगितले आहे की नुपूर शर्मा भाजपमधून 2022 मध्येच निलंबित झाल्या होत्या आणि हा व्हिडिओ त्यांच्या दिल्लीतील एका इतर धार्मिक कार्यक्रमाचा आहे.
भाजप दिल्लीचे मीडिया प्रमुख प्रवीण शंकर कपूर यांनी स्पष्ट केले की, नुपूर शर्मा सध्या भाजपच्या सदस्य नाहीत. त्यांच्या दिल्ली निवडणुकीतील सहभागाचा कोणताही पुरावा नाही.
2022 मध्ये एका टीव्ही चॅनलवरील चर्चेदरम्यान प्रेषित मुहम्मद पैगंबर यांच्यावर आक्षेपार्ह आणि वादग्रस्त टिप्पणी केली होती. त्यानंतर नुपूर शर्मा भाजपमधून 2022 मध्येच निलंबित झाल्या होत्या.
निष्कर्ष
व्हायरल होत असलेला व्हिडिओ दिल्ली निवडणुकीशी संबंधित नाही. हा व्हिडिओ जानेवारी 2024 मधील 'जन जागरण यात्रा' कार्यक्रमाचा आहे, जो राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आला होता. त्यामुळे त्या दिल्ली निवडणुकीच्या प्रचारात सहभागी झाल्या असल्याचा दावा चुकी आणि दिशाभूल करणारा आहे.
(Logically Facts या संकेतस्थळाने याबाबतचा रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. शक्ति कलेक्टिव्हचा भाग म्हणून 'सकाळ'ने याचं भाषांतर केलेलं आहे.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.