sakal fact check  Esakal
व्हायरल-सत्य

Fact Check : लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये कन्हैया कुमार, नवनीत राणा, अजय टेनी, माधवी लता हे सगळे एकाच फरकाने हरल्याचा समाज माध्यमांमधील दावा खोटा

ही पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत ईव्हीएम मशीनच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले

वृत्तसंस्था

Created By: PTI

Translated By: Sakal Digital Team

वृत्तसंस्था : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर, एका हिंदी वृत्तपत्राच्या कटिंगचा स्क्रीनशॉट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या स्क्रीनशॉटमध्ये भाजपच्या उमेदवार नवनीत राणा, अजय टेनी, माधवी लथा आणि काँग्रेस उमेदवार कन्हैया कुमार त्यांच्या संबंधित लोकसभा मतदारसंघात समान फरकाने (१९ हजार ७३१ मते) पराभूत झाल्याचे दाखविले आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत ईव्हीएम मशीनच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

'पीटीआय फॅक्ट चेक डेस्क' ने व्हायरल दावा तपासल्यानंतर तो खोटा असल्याचे समोर आले आहे. खरे तर ५ जून रोजी राजस्थान पत्रिकाच्या इंदूर आवृत्तीत चुकीचे आकडे प्रसिद्ध झाले होते. ज्याचा स्क्रीनशॉट खोटा दावा करून सोशल मीडियावर शेअर केला जात आहे.

फेसबुक युजर हरेंद्र साहनी यांनी मतांच्या चुकीच्या आकडेवारीच्या व्हायरल स्क्रीनशॉटला कॅप्शन देत म्हंटले की, “लोकांनी वर्तमानपत्र काळजीपूर्वक वाचावे!! यामध्ये चार उमेदवार सारख्याच मतांनी जिंकले आणि पराभूत झाले… १९७३१ चा आकडा काय सांगतो? हा योगायोग आहे की प्रयोग? लोकांमध्ये ईव्हीएम आणि निवडणूक आयोगाची विश्वासार्हता टिकवून ठेवण्यासाठी अशा निकालांचे बारकाईने निरीक्षण केले पाहिजे.. ईव्हीएममध्ये काही सेटिंग आहे, म्हणूनच मी पुन्हा पुन्हा सांगतो की ईव्हीएम कायमचे रद्द केले पाहिजेत. पोस्टची लिंक, संग्रहित लिंक आणि स्क्रीनशॉट येथे पहा.

sakal fact check

दावा काय?

निशा वामन नावाच्या दुसऱ्या फेसबुक युजरने वृत्तपत्राच्या कटिंगसोबत लिहिले, “कोण म्हणतो यावेळी ईव्हीएममध्ये कोणताही बिघाड झाला नाही. आपल्या लोकांनी वर्तमानपत्र काळजीपूर्वक वाचावे. यामध्ये चार उमेदवार समान मतांनी विजयी आणि पराभूत झाले. १९७३१ चा आकडा काय सांगतो? ईव्हीएम सेटिंग आहे.” पोस्टची लिंक, संग्रहित लिंक आणि स्क्रीनशॉट येथे पहा.

sakal Fact check

तपासणीत काय आढळले?

व्हायरल दाव्याची सत्यता जाणून घेण्यासाठी, डेस्कने प्रथम भारतीय निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाइटवर जात उमेदवारांची नावे या स्क्रीनशॉटमध्ये समाविष्ट आहेत त्यांच्या जिंकण्याचे आणि पराभवातील फरकाचे आकडे तपासले.

निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, महाराष्ट्राच्या अमरावती लोकसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार नवनीत राणा यांचा काँग्रेसचे उमेदवार बळवंत बसवंत वानखडे यांनी 19,731 मतांनी पराभव केला. येथे क्लिक करून अधिकृत आकडेवारी पहा.

तपासादरम्यान, डेस्कला आढळले की उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी मतदारसंघातून भाजप उमेदवार अजय टेनी यांना३४ हजर ३२९ मतांनी पराभव स्वीकारावा लागला. त्यांचा समाजवादी पक्षाचे उमेदवार उत्कर्ष वर्मा 'मधुर' यांनी पराभव केला. येथे क्लिक करून संपूर्ण यादी पहा.

हैदराबाद लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार माधवी लता यांचा १९,७३१ मतांनी पराभव झाल्याचा दावा व्हायरल स्क्रीनशॉटमध्ये करण्यात आला आहे. मात्र, निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार माधवी लता यांना हैदराबादच्या जागेवर एकूण ३ लाख २३ हजार ८९४ मते मिळाली. त्याचवेळी त्यांचे प्रतिस्पर्धी AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांना ६ लाख ६१ हजार ९८१ मते मिळाली, ज्यामुळे माधवी लता यांना ३ लाख ३८ हजार ८७ मतांनी पराभव स्वीकारावा लागला. येथे क्लिक करून संपूर्ण यादी पहा.

पुढील टप्प्यात, डेस्कने उत्तर पूर्व दिल्लीतील काँग्रेस उमेदवार कन्हैया कुमार यांच्या पराभवाच्या फरकाचीही तपासणी केली. आयोगाच्या वेबसाइटनुसार, काँग्रेस उमेदवार कन्हैया कुमार यांचा भाजप उमेदवार मनोज तिवारी यांच्याकडून १ लाख ३८ हजार ७७८ मतांनी पराभव झाला. येथे क्लिक करून संपूर्ण यादी पहा.

पुढील टप्प्यात डेस्कने गुगल लेन्सद्वारे व्हायरल वृत्तपत्राच्या कटिंग्ज रिव्हर्स शोधल्या. त्यावेळी ५ जून रोजी राजस्थान पत्रिकाच्या इंदूर आवृत्तीत प्रकाशित झालेल्या वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर व्हायरल स्क्रीनशॉट सारखा डेटा आढळला. हे चारही उमेदवार१९ हजार ७३१ मतांनी पराभूत झाल्याचे दिसून येते. पण , त्याच्या इतर आवृत्त्यांमध्ये योग्य आकडे प्रकाशित केले गेले होते. व्हायरल स्क्रीनशॉट, इंदूर आवृत्तीचा स्क्रीनशॉट आणि जयपूर आवृत्तीच्या ई-पेपरचा स्क्रीनशॉट येथे पहा.

sakal Fact check

पुढील टप्प्यात डेस्कने राजस्थान पत्रिकाच्या इंदूर ब्युरोच्या संपादकीय विभागाशी संपर्क साधला. त्यांच्याकडून उत्तर मिळताच बातमी अपडेट केली जाईल.

आमच्या आतापर्यंतच्या तपासावरून हे स्पष्ट झाले आहे की, भाजपचे उमेदवार नवनीत राणा, अजय टेनी, माधवी लता आणि काँग्रेस उमेदवार कन्हैया कुमार समान मतांनी पराभूत झालेले नाहीत. राजस्थान पत्रिकाच्या इंदूर आवृत्तीत चुकीची आकडेवारी प्रकाशित करण्यात आली होती, ज्याचा स्क्रीनशॉट खोटा दावा करून सोशल मीडियावर शेअर केला जात आहे.

वस्तुस्थिती

पीटीआय फॅक्ट चेक डेस्कने तपास केला आणि व्हायरल दावा खोटा असल्याचे आढळले.

निष्कर्ष

एका हिंदी वृत्तपत्राचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर शेअर केला जात आहे आणि असा दावा केला जात आहे की भाजपचे उमेदवार नवनीत राणा, अजय टेनी, माधवी लता आणि काँग्रेस उमेदवार कन्हैया कुमार लोकसभा निवडणुकीत त्याच फरकाने (१९,७३१ मतांनी) पराभूत झाले. पीटीआय फॅक्ट चेक डेस्कने व्हायरल दावा तपासला आणि तो खोटा असल्याचे आढळले. डेस्कला त्याच्या तपासात असे आढळून आले की हिंदी वृत्तपत्र राजस्थान पत्रिकाने त्याच्या इंदूर आवृत्तीत चुकीचे आकडे प्रकाशित केले होते, ज्याचा स्क्रीनशॉट खोटा दावा करून सोशल मीडियावर शेअर केला जात आहे.

('PTI' या संकेतस्थळाने याबाबतचा रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. शक्ति कलेक्टिव्हचा भाग म्हणून 'सकाळ'ने याचं भाषांतर केलेलं आहे.)

------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुणे बाजार समितीच्या दिलीप काळभोर यांचा सभापतीपदाचा राजीनामा

Pune court verdict : पत्नीशी दोनदा घटस्फोट, तिसऱ्यांदा लग्नाचं वचन देत केला बलात्कार? ; पुणे कोर्टाने पतीला सोडलं निर्दोष, कारण...

Latest Maharashtra News Updates : दिलीप काळभोर यांचा सभापतीपदाचा राजीनामा

Viral Video: महिला पोलिसाचं धाडस! महाकाय १६ फूट लांब किंग कोब्रा पकडला, पाहा थरारक व्हायरल व्हिडिओ

Navi Mumbai: रिल्स बनवण्यासाठी रेल्वेवर चढला, इतक्यात ओव्हरहेड वायरला चिटकला अन्...; क्षणात आयुष्य उद्ध्वस्त

SCROLL FOR NEXT