Tractor Subsidy Maharashtra Esakal
व्हायरल-सत्य

Tractor Subsidy: ट्रॅक्टर अनुदान पाच लाखांपर्यंत वाढले? अफवा की सत्य? कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले काय आहे खरं

Fact Check Tractor Subsidy Maharashtra: शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती प्रकार बदलून आधुनिक पद्धतीने शैती करावी, यासाठी कृषी यांत्रिकीकरण योजना कृषी विभागाने चालू केली आहे.

आशुतोष मसगौंडे

सातारा: कृषी यांत्रिकीकरण योजनेतंर्गत शेतकऱ्यांना अनुदानावर अवजारे दिली जातात. सध्या ट्रॅक्टरसाठी दीड लाख रुपये अनुदान असून, गेल्या दोन वर्षांपासून याची लॉटरीच निघालेली नाही. असे असताना ट्रॅक्टरचे अनुदान पाच लाख रुपये झाल्याचे समाज माध्यमातून पसरविले जात आहे. यातून शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची भीती आहे. त्यामुळे या अफवांवर विश्वास ठेऊ नये असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती प्रकार बदलून आधुनिक पद्धतीने शैती करावी, यासाठी कृषी यांत्रिकीकरण योजना कृषी विभागाने चालू केली आहे.

या योजनेतून अल्प भूधारकांपासून विविध प्रवर्गातील शेतकऱ्यांना अनुदानावर शेती अवजारे दिली जातात. त्यासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज भरून लॉटरी पद्धतीने या योजनेतील औजार मिळवून त्यांचे अनुदानही मिळविता येते; पण गेल्या दोन वर्षांपासून या योजनेत अनियमितता जाणवत आहे. मोठ्या अवजारांची लॉटरीच गेल्या दोन वर्षांपासून निघालेली नाही. त्यामुळे शेतकरी लॉटरी कधी निघेल याची वाट पाहत आहेत.

ट्रॅक्टर अनुदान वाढल्याबाबत समाज माध्यमावर सध्या सुरू असलेली जाहिरात ही अफवा आहे. या अफवांना शेतकऱ्यांनी बळी पडू नये.
भाग्यश्री फरांदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

गेल्या दोन वर्षांपासून या योजनेतील ट्रॅक्टरची लॉटरीच काढण्यात आलेली नाही. अशातच समाज माध्यमांवर सध्या ट्रॅक्टरचे अनुदान वाढल्याचे पसरविले जात आहे.

या योजनेतून ट्रॅक्टरसाठी दीड लाख रुपये अनुदान आहे. हे अनुदान अश्वशक्तीनुसार वाढते. आता हे अनुदान पाच लाख रुपये झाले असून, ते कसे मिळवायचे याबाबतचे व्हिडिओही व्हायरल झाले आहेत. त्यामुळे शेतकरी वाढीव अनुदान मिळेल या आशेपोटी अशा अफवांतून फसवणूक करून घेण्याची शक्यता वाढली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tembhurni Crime : गाडी पार्किंगच्या कारणावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यास गेलेल्या एकाचा चाकूने भोसकून खून; दोन संशयित आरोपींना अटक

Degloor Crime : बनावट ग्राहकाच्या सापळ्यात मोटारसायकल चोर जेरबंद; १० चोरीच्या दुचाकींसह एक आरोपी ताब्यात, एक फरार

Badnapur News : ‘साहेब, शेतकऱ्यांना भरीव मदत द्या, जनावरांसाठी चारा द्या’; वरुडीतील शेतकऱ्यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आर्जवी मागणी

Nagpur Crime : दारुड्या प्रवाशाचा हायव्होल्टेज ड्रामा! दारूच्या नशेत पकडली ठाण्यात पोलिसाची कॉलर

Gujarat UCC: गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यास राष्ट्रपतींची मंजुरी; काय असेल नियमावली?

SCROLL FOR NEXT