Created By : Vishvas News
Translated By: Sakal Digital Team
सोशल मीडियावर एक व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये सलमान खान, अनंत अंबानी, आणि राधिका अंबानी एकत्र दिसत आहेत आणि दावा केला जात आहे की हा व्हिडिओ महाकुंभमेळ्याचा आहे. अनेक लोकांनी हा व्हिडिओ शेअर केला आणि असे म्हणाले की, हे तिघे महाकुंभमेळ्याला पोहोचले आहेत आणि व्हिडिओ त्याच ठिकाणचा आहे.
व्हायरल व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, "अनंत अंबानी आणि सलमान खान महाकुंभात". या कॅप्शनसोबत व्हिडिओ शेअर करून दावा केला जात आहे की महाकुंभमेळ्यातील त्यांच्या व्हिडिओचा हा एक भाग आहे. हा व्हिडिओ ३० जानेवारी २०२५ रोजी 'baba_jay_yogi3490_hindu' या फेसबुक अकाऊंटवरुण शेअर केला गेला होता.
तपासात हे सत्य आढळले की हा व्हिडिओ महाकुंभमेळ्याचा नाही. हा व्हिडिओ जामनगरमधील आहे, जेव्हा अंबानी कुटुंबाने सलमान खानचा वाढदिवस साजरा करण्यासाठी एक पार्टी आयोजित केली होती. हा व्हिडिओ २०२४ मध्ये डिसेंबर महिन्यात शूट झाला होता आणि त्यात अंबानी कुटुंबाच्या पार्टीचे दृश्य आहे. akramvarkati_srk 1763 नावाच्या एका इंस्टाग्राम वापरकर्त्याने ३० डिसेंबर २०२४ मध्ये हा व्हिडिओ पोस्ट केला होता.
गुगलवर शोध घेतल्यावर सलमान खान आणि अनंत अंबानी महाकुंभाला गेले असं कोणत्याही प्रसिद्ध वृत्तपत्रांमध्ये काहीही आढळलं नाही.
गुगल रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर, या व्हिडिओच्या प्रमुख फ्रेम्स दिसल्या, ज्यावर 30 डिसेंबर 2024 रोजी इंस्टाग्राम वापरकर्त्याने पोस्ट केले होते. त्यात "जामनगरमधील रिलायन्स ग्रीन्समध्ये सलमान खान" असं लिहिलं होतं.
व्हिडिओवरील माहिती प्रमाणित करणारी बातमी २७ डिसेंबर २०२४ रोजी सलमान खानच्या ५९ व्या वाढदिवसाच्या पार्टीसंदर्भात आढळली. अंबानी कुटुंबाने जामनगरमधील रिलायन्स ग्रीन्समध्ये पार्टी आयोजित केली होती.
स्मिता श्रीवास्तव, वरिष्ठ पत्रकार, यांच्याशी बोलल्यानंतर त्यांनी सांगितले की हा व्हिडिओ जामनगरमधील आहे आणि सलमान खान, अनंत अंबानी, आणि राधिका अंबानी यांची उपस्थिती त्याच कार्यक्रमात होती.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये सलमान खान, अनंत अंबानी, आणि राधिका अंबानी एकत्र दिसत आहेत, पण हा व्हिडिओ महाकुंभमेळ्याचा नाही. तपासात असे स्पष्ट झाले की या व्हिडिओचा संबंध महाकुंभमेळ्याशी नाही, तर जामनगरमध्ये सलमान खानच्या वाढदिवसाच्या पार्टीशी संबंधित आहे.
(Vishwas News या संकेतस्थळाने याबाबतचा रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. शक्ति कलेक्टिव्हचा भाग म्हणून 'सकाळ'ने याचं भाषांतर केलेलं आहे.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.