love story sakal
व्हायरल-सत्य

PUBG खेळताना इश्क वाला लव्ह... प्रियकरासाठी तिनं 4 लेकरांसह पाकिस्तान सोडत गाठला भारत

प्रेम कधी, कोणासोबत आणि कुठे होईल हे सांगता येत नाही.

Aishwarya Musale

प्रेम कधी, कोणासोबत आणि कुठे होईल हे सांगता येत नाही. प्रेमाला ना रंग दिसतो ना जात, ना धर्म ना सीमा. असाच एक प्रकार ग्रेटर नोएडामध्ये समोर आला आहे. PUBG गेम खेळणारा तरुण चार मुलांच्या आईच्या प्रेमात पडला. या महिलेने तीन देशांची सीमा ओलांडली आणि ग्रेटर नोएडा गाठली. रबुपुरा येथे भाड्याचे घर घेऊन दोघे एकत्र राहू लागले.

पाकिस्तानी महिला नेपाळमार्गे भारतात पोहोचल्याचे सांगण्यात येत आहे. घरमालकाला सचिन नावाच्या तरुणाने आपले लग्न झाल्याचे सांगितले आणि महिलेने आपले नाव सीमा सांगितले. महिनाभरानंतर हे रहस्य उघड झाल्यावर महिला आणि सचिन मुलांसह पळून गेले. गौतमबुद्ध नगर आयुक्तालय पोलिसांना या प्रेम कहाणीची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी महिलेचा शोध घेण्यास सुरुवात केली.

सीमा आणि सचिन यांना हे कळताच ते चार मुलांना घेऊन टॅक्सीतून जेवरच्या दिशेने पळून गेले. आता पोलीस टॅक्सी चालक आणि आजूबाजूच्या लोकांची चौकशी करून पोलीस महिलेचा शोध घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, 13 मे रोजी पाकिस्तानी महिला चार मुलांसह बसने ग्रेटर नोएडाला पोहोचली.

पाकिस्तानी महिला भारतीय तरुणाच्या प्रेमात पडली

रबुपुरा येथील रहिवासी असलेल्या सचिनला PUBG खेळण्याचे व्यसन होते, असे सांगितले जात आहे. गेम खेळत असताना सचिन एका पाकिस्तानी महिलेच्या संपर्कात आला. दोघांची मैत्री संवादातून सुरू झाली. चर्चेनंतर हे प्रकरण प्रेमापर्यंत पोहोचले. खेळ खेळत असताना दोघेही एकमेकांसोबत जगण्याची आणि मरण्याची स्वप्ने पाहू लागले.

13 मे रोजी महिलेने पाकिस्तान सोडण्याचा निर्णय घेतला. आश्चर्याची बाब म्हणजे चार मुलांसह तीन देशांची सीमा ओलांडताना ही महिला ग्रेटर नोएडामध्ये पोहोचली. ग्रेटर नोएडामध्ये भाड्याने घर घेऊन प्रियकर सचिनसोबत राहू लागली. महिला पाकिस्तानी असल्याचा सुगावा मिळताच पोलिसांनी तीन टीम तयार केली. सीसीटीव्ही आणि इलेक्ट्रॉनिक सर्व्हेलन्सची मदत घेण्यात आली.

सतत छापे टाकून शोध घेतल्यानंतर महिला पोलिसांनी पकडले. एडीसीपी अशोक कुमार यांनी सांगितले की, महिलेची चौकशी सुरू आहे. याची माहिती तपास यंत्रणांना देण्यात आली आहे. तपास यंत्रणांना सतर्क करण्यात आले आहे.

सीमा गुलाम हैदर असे पाकिस्तानी महिलेचे नाव सांगितले जात आहे. त्यांनी सांगितले की, PUBG खेळताना ही महिला सचिनच्या संपर्कात आली होती. पाकिस्तानी महिला 4 मुलांची आई आहे. चौकशीनंतर तपास यंत्रणा तपशील शेअर करतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युरोपात ३०-३५ डिग्री सेल्सिअसने हाहाकार, भारतात ४५वर पारा पोहोचूनही रस्ते वितळत नाहीत; कारण काय?

५ सामने, ३० चौकार, २९ षटकार अन् ३५५ धावा... Vaibhav Sooryavanshi ची इंग्लंडमधील कामगिरी भारताला विचार करायला लावणारी..

Small Savings Schemes: PPF आणि पोस्ट ऑफिस FD गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! पुढील 3 महिन्यांसाठी व्याजदर जाहीर; पाहा नवे दर

Ramtirth Waterfall : पांढराशुभ्र फेस अन् खळखळणारा आवाज! आंबोलीतील प्रसिद्ध रामतीर्थ धबधबा प्रवाहित; पावसाच्या पाण्यामुळं खुललं सौंदर्य, पर्यटकांची गर्दी

Europe Heatwave: युरोपमध्ये उष्णतेचा कहर! रस्ते वितळले, लोखंडी ट्रॅक वाकले, हजारो नागरिक रुग्णालयात...भयानक व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT