Fact Check Screenshot, Biswajit Sarkar, Youtube.
व्हायरल-सत्य

Fact Check: बांगलादेशातील रोहिंग्या खरचं पश्चिम बंगालमध्ये घुसखोरी करत आहेत का? जाणून घ्या व्हायरल व्हिडिओमागील सत्य

Rohingyas: दरम्यान, बांगलादेशातल रोहिंग्या मुस्लीम सीमा ओलांडून भारतातील पश्चिम बंगालमध्ये प्रवेश करत असल्याचा दावा व्हिडिओच्या माध्यमातून केला जात आहे.

सकाळ डिजिटल टीम

Rohingyas from Bangladesh infiltrating West Bengal? Fact check of the viral video:

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत असून, या व्हिडिओमध्ये काही लोक काटेरी कुंपण ओलांडताना दिसत आहेत.

दरम्यान, बांगलादेशातल रोहिंग्या मुस्लीम सीमा ओलांडून भारतातील पश्चिम बंगालमध्ये प्रवेश करत असल्याचा दावा व्हिडिओच्या माध्यमातून केला जात आहे.

पण व्हिडीओची सत्यता तपासली असता, यातून वेगळेच सत्य समोर आले आहे.

काय आहे दावा?

बांगलादेशी रोहिंग्या मुस्लीम सीमा ओलांडून बेकायदेशीरपणे देशातील पश्चिम बंगला राज्यात प्रवेश करत असल्याचा दावा सोशल मीडिया X वर एका यूजरने केला आहे.

यूजरने हा व्हिडिओ 11 फेब्रुवारी 2024 रोजी शेअर केला होता, जो आतापर्यंत सुमारे 29 हजार लोकांनी पाहिला आहे.

व्हिडिओबाबतचे सत्य

या दाव्याबाबतची तथ्थे तपासल्यानंतर आम्हाला हा दावा खोटा असल्याचे आढळले.

रोहिंग्या भारतात घुसत असल्याचा दावा करत पोस्ट केलेला व्हिडिओ मूळ विश्वजित सरकार नावाच्या युट्यूब चॅनलवरील आहे.

विश्वजित यांनी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिहिले की, 'या व्हिडिओमध्ये बांगलादेशातून सीमा ओलांडून भारतात घुसखोरी करत असलेले भाटिया मुस्लिम दिसत आहेत. हे लोक कामासाठी भारतात येतात आणि भारतातील वेगवेगळ्या राज्यात पसरतात. त्यापैकी बरेच जण भारतात कायमचे राहतात.'

आम्ही केलेल्या पाडताळणीत असे आढळले की, हा व्हिडिओ पहिल्यांदा 15 एप्रिल 2015 रोजी विश्वजित सरकार यांनी आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड केला होता.

मात्र, आता 11 फेब्रुवारी 2024 रोजी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर इमॉन मुखर्जी नावाच्या यूजरने मूळ व्हिडिओतील काही भाग दाखवत, बांग्लादेशातील रोहिंग्या मुस्लीम पश्चिम बंगालमध्ये घुसखोरी करत असल्याचा दावा केला आहे.

सर्व तथ्थे तपासल्यानंतर आम्हाला आढळले की, हा व्हिडिओ दिशाभूल करणारा आणि खोटा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

मोठी बातमी! भाजपकडून ३ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT