Virat Kohli Watching Rahul Gandhi's Press Conference Esakal
व्हायरल-सत्य

Fact Check: IPL सामन्यापूर्वी विराट पाहतोय राहुल गांधीची पत्रकार परिषद? वाचा व्हायरल फोटोमागील सत्य

Virat Kohli: आयपीएलच्या 17 व्या हंगामाला आजपासून सुरुवात झाली आहे. त्यामुळे क्रिकेट रसिकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. आशात आवडते खेळाडू आणि संघांबाबत चाहते उलट-सुलट दावे करत आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Fact Check On Virat Kohli Watching Rahul Gandhi's Press Conference:

आयपीएलच्या 17 व्या हंगामाला आजपासून सुरुवात झाली आहे. त्यामुळे क्रिकेट रसिकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. आशात आवडते खेळाडू आणि संघांबाबत चाहते उलट-सुलट दावे करत आहेत.

दरम्यान सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. ज्यामध्ये टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा स्टार विराट कोहली मोबाइलमध्ये राहुल गांधी यांचा व्हिडिओ पाहत असल्याचे दिसत आहे. मात्र, आम्ही याबाबत सत्य तापसल्यानंतर यातून वेगळेच सत्य समोर आले आहे.

दावा

'एक्स'वर अक्षित नावाच्या एका यूजरने दि. 22 मार्च 2024 रोजी विराट कोहलीचा एक फोटो शेअर केला आहे.

या फोटोसह यूजरने लिहिले आहे की, "असे दिसते की विराट कोहली राहुल गांधींची पत्रकार परिषद पाहत होता, ज्यामध्ये राहुल गांधी काँग्रेसची बँक खाती गोठवल्याबद्दल बोलत आहेत."

"भारताचा लोकशाहीवादी आणि धर्मनिरपेक्ष नागरिक म्हणून कोहली असंवैधानिकपणे काँग्रेसची बँक खाती गोठवल्याबाबत जागरूक आहे," या यूजरने पुढे म्हटले आहे.

सत्य

या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओबाबत शंका आल्यानंतर यामागील सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आम्ही संबंधीत फोटोचे Reverse Image Search केले.

यावर आम्हाला असे आढळले की, हा फोटो पहिल्यांदा दि. 20 मार्च 2024 रोजी 'विराट फॉरएव्हर' नावाच्या इन्स्टाग्राम प्रोफाईलवरुन पोस्ट करण्यात आला आहे.

'विराट फॉरएव्हर' नावाच्या युजरने हा फोटो पोस्ट करताना म्हटले आहे की, "जाहिरातीच्या चित्रिकरणापूर्वी विराट निवांत क्षणाचा आनंद घेत आहे."

हे सर्व पुरावे पाहाता आम्हाला असे आढळले की, विराट राहुल गांधींची पत्रकार परिषद पाहत असल्याचा दावा खोटा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant : ‘कोर्टाची दारे सर्वांसाठी खुली’: इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटीस नकार देत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण

Gold Price Today: दसऱ्याआधी सोन्याचे भाव घसरले! ग्राहकांना मोठा दिलासा; आजचे 22, 24 कॅरेटचे दर पाहा

मृत्यू घासून गेला ! भरधाव कारने बाईकला उडवले... तरुण अलगद रस्त्यावर पडला, साधं खरचटलंही नाही, CCTV 13 second Video Viral

Nagpur News: तिसरा रिंगरोड ठरणार प्रगतीचा महाकॉरिडॉर!; १०७ गावांतून जाणार १४९ किमी मार्ग; रस्ता, मेट्रो अन् टाऊनशिपचे नियोजन

Kolhapur Gokul Election Latest News : 'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत'; मुख्‍यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सतेज पाटलांना चंद्रकांतदादांचा इशारा

SCROLL FOR NEXT