Ashadhi Akadashi 2023 Upvas Recipe esakal
वारी

Ashadhi Ekadashi 2023 : नेहमीचे उपवासाचे पदार्थ खाऊन कंटाळा आलाय? मग हे कुरकुरीत,टेस्टी पदार्थ ट्राय करा

Ashadhi Akadashi 2023 Upvas Recipe: यंदाच्या उपवासाला काहीतरी वेगळं ट्राय करा

साक्षी राऊत

Ashadhi Akadashi 2023 Upvas Recipe : सगळ्या उपवासाचे पुण्य एका एकादशीत आहे असे म्हटले जाते. एकादशीच्या दिवशी बहुतांश लोकांचा उपवास असतो. मात्र शाबुदाण्याची खिचडी, वरईची खिर, भात हे नेहमीच्याच उपवासाचे पदार्थ. जे आपण नेहमीच खात असतो. तेव्हा यंदाच्या उपवासाला काहीतरी वेगळं ट्राय करा.

रताळे तुम्ही एरवी खात असाल पण कधी रताळ्याची किंवा वऱ्याच्या तांदळाच्या पिठाची चकली तुम्ही खाल्ली आहे काय? हा पदार्थ खायला अगदी कुरकुरीत आणि टेस्टी लागतो. चला तर मग जाणून घेऊया रेसिपी.

या पदार्थासाठी लागणारे साहित्य(Ratalyachi Chakli Recipe)

रताळी

वरयाचे तांदूळ

हिरव्या मिरच्या

आले

मीठ

कृती

रताळी आधी उकळून नंतर सोलून आणि किसून घ्या. नंतर त्यात वऱ्याच्या तांदळाचे पीठ हिरव्या मिरच्या थोडे वाटलेले आले आणि मीठ घालून पीठ तयार करा. नंतर या पिठाच्या चकल्या करून गरमा गरम खायला घ्या.

केळीचा रायता (Kelyacha Raita Recipe)

केळीच्या रायत्यासाठी लागणारे साहित्य

पिकलेली केळी

वाळलेले बारीक खोबरे : १/२ कप

लिंबू : १

वेनिला किंवा साधे दही : १ कप

बारीक कापलेले बदाम : १ टेबल स्पून.

कृती

वाळलेले बारीक खोबरे कोरडे च तांबुस होईपर्यंत भाजा.

केळ्यांचे तुमच्या आवडीनुसार काप करा.त्या कापांना लिंबाचा रस चांगला लावा म्हणजे केळी काळी पडणार नाहीत. (Recipe)

त्या कापांमधे दही,खोबरे आणि बदाम टाकून चांगले एकत्र करा.झाला तुमचा रायता तयार.

तुम्ही हा रायता गार करून किंवा तसाच खाऊ शकता.तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही त्यात थोडी साखर घालू शकता.

हा रायता तुम्ही साइड डिश म्हणून किंवा स्नॅक म्हणूनही खाऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : सन्माननीय उद्धव ठाकरे...म्हणत राज ठाकरेंची भाषणाला सुरुवात...

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

Mumbai : आमचं नातं शरीर संबंधाच्या पलिकडचं, आजही...; विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षिकेचा खळबळजनक दावा

ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव सहभागी; "झेंडा नाही अजेंडा बघून लोक एकत्र"

SCROLL FOR NEXT