Ashadhi Ekadashi 2023 esakal
वारी

Ashadhi Ekadashi 2023 : आषाढी एकादशीला तुमच्या राशीनुसार या वस्तू दान करा, घरात नांदेल सुख-समृद्धी

या दिवशी काही गोष्टी दान केल्याने तुमच्या घरात कायम सुख-समृद्धी नांदेल

सकाळ ऑनलाईन टीम

Ashadhi Ekadashi 2023 : आषाढ महिन्याच्या शुद्ध पक्षातील एकादशीला आषाढी एकादशी म्हणतात. राज्यातील विविध भागांतील लोक विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला निघतात. आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी किंवा पद्मनाभा एकादशी असेही म्हटले जाते. महाराष्ट्रात आषाढी एकादशीचे महत्व अतिशय वेगळे आहे. तेव्हा या दिवशी काही गोष्टी दान केल्याने तुमच्या घरात कायम सुख-समृद्धी नांदेल.

आषाढी एकादशीचा मुहूर्त?

भारतीय पंचांगानुसार, सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा असल्यामुळे आषाढी एकादशी गुरुवारी 9 जून २०२३ रोजी साजरी करण्यात येईल. आषाढी एकादशीला २९ जून रोजी ३ वाजून १८ मिनिटांनी होईल. तर आषाढी एकादशीची समाप्ती ३० जून २०२३ रोजी पहाटे २ वाजून ४२ मिनिटांनी होणार आहे.

आषाढी एकादशीला राशीनुसार दान करा

देवशयनी म्हणजेच आषाढी एकादशीच्या दिवशी राशीनुसार दान केल्यास अनेक फायदे तुम्हाला होतील. ज्योतिष सुजीतजी महाराज यांनी आषाढी एकादशीच्या दिवशी दान करण्याचे महत्व सांगितले आहे. चला तर मग प्रत्येकाने त्याच्या राशीनुसार काय दान करावे जाणून घ्या.

मेष - या राशीच्या लोकांनी एकादशीच्या दिवशी अन्न दान करावे. याशिवाय कुठल्याही धार्मिकस्थळावरून बेलाचे रोप लावाणे शुभ मानले जाते. गहू, गोड पदार्थही तुम्ही दान करू शकतात. रूग्णालयात खिचडी आणि फळेही तुम्ही दान करू शकता.

वृषभ - वृषभ राशीच्या लोकांनी तांदूळ दान करावे. पांढरे कपडे धार्मिक स्थळावरील पुजाऱ्यांना दान करावे. तसेच गायीला चारा, चपाती किंवा गुळ खायला घाला.

मिथुन - या राशीच्या लोकांनी हिरेव वस्त्र दान करावे. गाईला हिरवागार चारा खायला द्यावा. तसेच धार्मिक पुस्तकांचे वितरण करावे. हे या राशीसाठी शुभ ठरेल.

कर्क : या राशीच्या लोकांनी तांदूळ दान करावेत. पांढरे किंवा पिवळे कपडे दान करणे लाभदायक असते. गायीला चारा द्यावा.

सिंह : सिंह राशीच्या लोकांनी गहू दान करावे. तसेच तांब्याचा सूर्य बनवून मंदिरात दान करा. श्री हनुमानाच्या मंदिरात लाल वस्त्र चढवावे. (Ashadhi Wari)

कन्या : या राशीच्या लोकांनी हिरव्या रंगाचे कपडे दान करावे. गायीला चारा द्यावा. मंदिरात घंटा चढवू शकतात आणि रुग्णालयात फळेही दान करू शकता.

तूळ - या राशीच्या लोकांनी मंदिरात अगरबत्ती, कापूर, पांढरे कपडे दान करावे. सुगंधित अगरबत्तीही तुम्ही दान करू शकता.

वृश्चिक - वृश्चिक राशीच्या लोकांनी गहू, मसुरची डाळ दान करावी. लाल कपडे दान केल्याने अनेक आजारापासून मुक्ती मिळेल. (Ashadhi Akadashi)

धनु : धनु राशीच्या लोकांनी चण्याची डाळ आणि केळं दान केल्यास सुख-समृद्धी प्राप्त होईल. धार्मिक पुस्तकांचे वितरणही तुम्ही करु शकतात. गोड वस्तूंचेही दान मंदिरात करावे.

मकर - या राशीच्या लोकांनी तीळ आणि उडीद डाळ दान करावे. काळे कपडे आणि लोखंडी कढई दान उत्तम ठरेल. तसेच शनी मंदिरात जाऊन तेल वाहावे.

कुंभ - या राशीच्या लोकांनी उडीद डाळ आणि काळे तीळ दान करावे. गरिबांमध्ये काळे वस्त्र वितरित करा. विष्णु मंदिरात अन्न आणि पिवळे वस्त्र दान करावे.

मीन - या राशीच्या लोकांनी चणाडाळ आणि फळं दान करावी. किंवा श्री विष्णु मंदिरात पिवळे कपडे द्यावेत.

डिस्क्लेमर - वरील लेख सामान्य माहितीवर आधारलेला असून सकाळ समुह याची पुष्टी करत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Narwekar statement : अलिबाग येथे शेतकऱ्यांमधील वादाच्या व्हिडिओवरून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा खुलासा

Maha Shivratri 2026 Song: नमो नमो शंकरा! कोट्यावधी चाहत्यांनी पाहिलं; तरीही पुन्हा ऐकावं वाटणारं भक्तिगीत

Latest Marathi News Live Update : महाशिवरात्रीनिमित्त कपिलेश्वर महादेव मंदिरावर फुलांची सुंदर सजावट

Maratha History : कोल्हापूरच्या छत्रपतींची समाधी पाकिस्तानच्या कराचीत कशी? मराठ्यांचा हा धगधगता इतिहास तुम्हाला माहिती असायलाच हवा

Nashik : त्र्यंबकेश्वरला जाताना भाजप खासदाराच्या कारला आग, काही क्षणात कार जळून खाक

SCROLL FOR NEXT