ashadhi ekadashi Former Prime Minister Lal Bahadur Shastri Pandharpur without seeing lord Vitthal 
वारी

Ashadhi Ekadashi: ...तेव्हा लालबहाद्दूर शास्त्री विठ्ठलाचं दर्शन न घेताचं परत गेले होते

भारताचे माजी पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री पंढरपूरात विठ्ठलाचं दर्शन घेण्यास आले होते पण ते पंढरपूर स्थानकातूनच परत गेले.

सकाळ डिजिटल टीम

पंढरपूरच्या सावळ्या विठुरायाच्या भेटीच्या ओढीने हजरो वारकरी कित्येक किलोमीटर्सचा प्रवास करत पंढरीत पोहोचले आहेत. उद्या पहाटे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते शासकीय पूजा पार पडेल. भल्या पहाटे होणाऱ्या या पूजेच्या मंगलमयी वातावरणाची अनुभूती घेण्याची प्रत्येकाची इच्छा असते. यावेळी प्रत्येकाला आस असते ती म्हणजे लाडक्या विठुरायाच्या दर्शनाची. पण या गोष्टीला भारताचे माजी पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री अपवाद आहेत.

भारताचे माजी पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री पंढरपूरात विठ्ठलाचं दर्शन घेण्यास आले होते पण ते पंढरपूर स्थानकातूनच परत गेले. तर असं का?

ज्यावेळी लालबहाद्दूर शास्त्री पंढरपूरमध्ये आले होते त्या काळात पंढरपूरात कॉलराची साथ होती. त्यामुळे कॉलराची लस टोचल्याशिवाय पंढरपूरात प्रवेश नव्हता.

मात्र, लालबहाद्दूर शास्त्रींनी लस टोचण्यास विरोध केला. ‘मी आयुष्यात कोणतीच लस टोचली नाही त्यामुळे आताही टोचणार नाही’ असं म्हणत लालबहाद्दूर शास्त्रींनी स्टेशनवरुनच विठोबाचे दर्शन घेणे पसंत केले आणि तेथूनच परत गेले.

१८१७ मध्ये ब्रिटिशांच्या अमलाखालील भारतात प्रथमच कॉलराची साथ आली, असे मानले जाते. ही सर्वांत भयावह साथ होती.

याचा पहिला रुग्ण २३ ऑगस्ट १८१७ रोजी आढळला. या साथीतील मृतांची नोंद झाली नसल्याने ती संख्या समजू शकत नाही. पुढे १८२९ मध्ये बारा वर्षांनी पुन्हा भारताला दुसऱ्यांदा कॉलराच्या साथीने ग्रासले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic Update : महत्त्वाची बातमी! पुण्यात आज 'या' मार्गावरील वाहतूक दुपारी 1 ते 4 च्या दरम्यान बंद राहणार; पर्यायी मार्ग कोणते?

Travel Guide : अनवट संस्कृतीचे दर्शन! आसाम आणि मेघालयचा प्रवास म्हणजे निसर्ग आणि संस्कृतीचा अनुभव

Ramdas Kadam : 'बाळासाहेबांचा मृतदेह २ दिवस मातोश्रीवर ठेवला' ही माहिती रामदास कदमांना कुणी दिली? स्वत: सांगितलं नाव...

Maharashtra tourism : महाराष्ट्राचे दार्जिलिंग! फोफसंडी गावाची या खासियत तुम्हाला माहीत आहे का? जाणून घ्या

Pune Crime: पुण्यातील दौंडमध्ये थरारक घटना! पत्नीचा गळा दाबून खून, नंतर उचललं टोकाचं पाऊल

SCROLL FOR NEXT