Sant Dnyaneshwar maharaj Palkhi Route
Sant Dnyaneshwar maharaj Palkhi Route Sakal
वारी

Ashadhi Wari : अलंकापुरीकडे वारकऱ्यांची रीघ; असा असेल पालखी मार्ग

सकाळ वृत्तसेवा

माऊलींच्या पालखीचे प्रस्थान मंगळवारी (ता. २१) देऊळवाड्यातून पंढरीच्या दिशेने होणार आहे.

आळंदी - पालखी प्रस्थान सोहळा याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी गळ्यात तुळशीच्या माळा, कपाळी चंदनाचा टिळा अन् खांद्यावरील भगवी पताका उंचावत हजारोंच्या संख्येने राज्यभरातून वारकऱ्यांचा ओघ आळंदीत सुरू आहे.

माऊलींच्या पालखीचे प्रस्थान मंगळवारी (ता. २१) देऊळवाड्यातून पंढरीच्या दिशेने होणार आहे. पालखी सोहळ्यातील वारीची परंपरा खंडित होऊ नये म्हणून अनेकांची पावले आळंदीकडे वळू लागली आहेत. खांद्यावर भगव्या पताका घेत वारकरी आळंदीत येत आहेत. प्रदक्षिणा मार्ग आणि इंद्रायणी नदीच्या काठावर वारकरी दिसत आहेत.

कोरोनाच्या महामारीने दोन वर्षे वारी खंडित झाली होती. अनेकांनी घरात बसूनच नामस्मरण केले. मात्र, काळजी घेत वारकरी वारीत सहभागी होत आहेत. अनेकांनी लसीकरण करूनच वारीत सहभागी झालो असल्याची माहिती दिली. अनेकांच्या तोंडावर मास्क नसले; तरी कापडी गमच्या, तर महिलांकडे स्कार्फ आणि पदर गुंडाळून खबरदारी घेत असल्याचे चित्र आहे. एकंदर भाविक स्वतःची काळजी घेताना दिसत आहेत. ठिकठिकाणी राहुट्या अन् तंबूतून मुक्काम करत आहेत. धर्मशाळांमधून वारकरी थांबत आहेत. सिद्धबेट, गोपाळपुरा, वडगाव रस्ता भागात वारकऱ्यांची ‍विशेष गर्दी दिसत आहे.

प्रशासनाकडून अंतिम आढावा

भाविकांना सुविधा पुरविण्यासाठी अंतिम आढावा बैठक प्रांत अधिकारी विक्रांत चव्हाण यांनी घेतली. पालिका आजही अतिक्रमणे काढत होती. पाणीपुरवठा चोवीस तास विभागवार केला जात आहे, तर शहरात धुरळणी आणि जंतुनाशक पावडर मारली जात आहे. भाविकांसाठी मुबलक रॉकेल आणि गॅस सिलिंडर वाटप सुरू आहे. रॉकेलचा काळा बाजार होत असल्यास महसूल अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.

आळंदीत लोकशिक्षणाचा अभिनव उपक्रम

आळंदी (ता. खेड) येथे पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त विश्‍वशांती केंद्र, माईर्स एमआयटी व आळंदी-देहू परिसर विकास समिती यांच्या वतीने रविवार, (ता. १९) ते मंगळवारपर्यंत (ता. २१) युनेस्को अध्यासन अंतर्गत लोकशाही, मानवाधिकार, शांती व सहिष्णुतेसाठीचा लोकशिक्षणाचा अभिनव उपक्रमाचे आयोजन केले आहे. त्यानिमित्ताने व्याख्यान, प्रवचन, कीर्तन व भक्ती संगीत भजनाचे विविध कार्यक्रम होणार आहेत.

या महोत्सवात सायंकाळच्या साडेपाच ते साडेसहाच्या सत्रात आळंदी येथील आसाराम बडे, सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष भागवताचार्य तुळशीराम गुट्टे, रविदास सिरसाठ यांची प्रवचने होणार आहेत. सायंकाळच्या सात ते नऊच्या सत्रात जालना येथील सुदाम पानेगावकर, भगवतीताई दांडेकर (सातारकर) आणि ज्ञानेश्‍वरीचे गाढे अभ्यासक किसन महाराज साखरे यांची कीर्तने होणार आहेत. तसेच, डॉ. मोरवंचीकर लिखित ‘समाधीतील स्पंदने’ या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. रोज रात्री सव्वानऊ ते साडेअकराच्या सत्रात अमोल पटवर्धन व कल्याणी शेट्ये आणि आदिनाथ कुटे यांच्या भक्तिसंगीताचा कार्यक्रम होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ramesh Chennithala : मतदारांचा कल ‘इंडिया’ आघाडीकडे

Loksabha Election 2024 : मोदी, ठाकरे, गांधी, पवार यांचीच हवा

Election Commission : निवडणूक आयोगाकडून तंत्रज्ञानस्नेही कारभाराला प्राधान्य

Devendra Fadnavis : कल्याण-मुरबाड रेल्वेमार्ग नगरपर्यंत नेणार

Success Story : पोरीची जिद्दच लय मोठी! अपघातात हात गमावला तरी अनामता डगमगली नाही, बोर्डात मिळवले ९२ टक्के मार्क्स

SCROLL FOR NEXT