Ashadi wari 2022 Saint Dnyaneshwar Maharaj and Saint Sopandev Maharaj palkhi rigan  sakal
वारी

बंधूभेटीच्या सोहळ्याने गहिवरला भक्तिसागर

सकल संतांच्या पालख्या पंढरपूर तालुक्यात

विलास काटे

भंडीशेगाव : ठाकुरबुवाच्या समाधी मंदिराजवळ माउलींच्या अश्वांनी रंगविलेल्या रिंगणानंतर तोंडले येथील नंदाच्या ओढ्यात एकमेकांवर पाणी शिंपडत निघालेला वैष्णवांचा सोहळा सायंकाळी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत सोपानदेव महाराज यांच्या भेटीने गहिवरला. वेळापूर तळावर पहाटेची महापूजा प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, पालखी सोहळा प्रमुख अॅड. विकास ढगे यांच्या उपस्थितीत झाली. हरिनामाचा गोडवे गात सोहळा मार्गक्रमण करीत होता. सकाळचे काकड्याचे अभंग गात वारकरी ठाकुरबुवाच्या समाधी मंदिराजवळ असलेल्या सोहळ्यातील तिसऱ्या रिंगणाजवळ पोचला. रथापुढील सत्तावीस दिंड्या अगोदर रिंगणात गेल्या. त्यानंतर पालखी होती.

दिंड्यांच्या रिंगणातील एक रिंगण पूर्ण करून पालखी मधोमध ठेवण्यात आली. त्याच्या भोवती भगव्या पताकांची दाटी झाली. भोपळे दिंडीच्या मानकऱ्याने तीन फेऱ्या मारल्या. त्यानंतर स्वाराच्या आणि माउलींच्या अश्वाने रिंगणात दौड सुरू केली. एकमेकांशी स्पर्धा करीत माउलींच्या अश्वाने तब्बल चार फेऱ्या मारल्या.

सकाळी अकराच्या सुमारास पालखीने रिंगणातून मार्गक्रमण सुरू केले. सोहळा अकराच्या सुमारास नंदाच्या ओढ्यात आला. दुपारी एक वाजता पालखी पुन्हा मार्गस्थ झाली. आजच्या वाटचालीत सर्वांचे आकर्षण असलेला माऊली आणि सोपानदेव भेटीचा सोहळा पार पडला.

गर्दीमुळे बंधूभेट अलीकडेच

दरवर्षी टप्प्याजवळ बंधूभेटीचा सोहळा होतो. मात्र, तेथे उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने अलीकडे दसूरच्या सावंतवाडी हद्दीत सोहळा नियोजित होता. मात्र, संत तुकाराम महाराज, संत सोपानदेव महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यांमध्ये समन्वय न झाल्याने शंभर मीटर अलीकडेच हा सोहळा करण्यात आला, असे सोहळाप्रमुख अॅड. विकास ढगे यांनी सांगितले.

आता पंढरपूरजवळ येऊ लागले तसी विठ्ठलभेटीची ओढ लागली आहे. आपली वारी यंदा रुजू होत असल्याचा आनंद आहे. सारे काही करणारा आणि करवून घेणारी माऊली आहे.

- राधाबाई दरणे, उमरी, नांदेड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC World Cup: महिला विश्वविजेत्यांचा ‘डायमंड’ सन्मान! हिरे आणि सौर उर्जेची दुहेरी भेट; उद्योगपती आणि खासदारांकडून खास गिफ्ट

Dhule News : गुलाबी थंडीची वाट, पण 'पर्जन्यराजा' थांबायला तयार नाही! धुळ्यात नोव्हेंबरमध्येही पावसाळी वातावरण, नागरिक हैराण

Women's World Cup: भारतीय खेळाडूच्या आजीला आलेला हार्टअॅटॅक, पण वर्ल्ड कपसाठी कुटुंबाने घेतलेला मोठा निर्णय

Mumbai News: मुंबई सेंट्रल एसटी स्थानक राज्यात अव्वल; स्वच्छ, सुंदर बसस्थानक’ उपक्रमात मानाचा तुरा

Shah Rukh Khan vs Salman Khan: शाहरुख की सलमान कोण आहे संपत्तीत वरचढ, एकाकडे मन्नत, दुसऱ्याकडे माउंटन व्ह्यू! पैशाचा बादशाह कोण?

SCROLL FOR NEXT