Ashadi wari 2022 sant tukaram maharaj palkhi at pirachi kuroli pandharpur  sakal
वारी

तुका म्हणे धावा, आहे पंढरी विसावा

सकल संतांच्या पालख्यांनी आज पंढरपूर तालुक्यात प्रवेश केला तर भक्तीमय वातावरणात तुकोबारायांचा सोहळा पिराची कुरोलीत विसावला.

राजेंद्रकृष्ण कापसे

पिराची कुरोली : पंढरीरायाच्या भेटीस निघालेल्या पालखी सोहळ्यातील वैष्णव भक्तांनी पंढरी समीप येताच पांडुरंगाचा धावा केला. सकल संतांच्या पालख्यांनी आज पंढरपूर तालुक्यात प्रवेश केला तर भक्तीमय वातावरणात तुकोबारायांचा सोहळा पिराची कुरोलीत विसावला. बोरगाव ग्रामस्थांच्या वतीने पादुकांना पहाटे अभिषेक केला. त्यानंतर सोहळा माळखांबीला मार्गस्थ झाला. अवघ्या चार किलोमीटरचा टप्पा पार केला की, माळखांबीला पालखी साडेसात वाजता पोचली. येथे सकाळी सोहळा जेवणासाठी थांबला. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने पूजा करण्यात आली. त्यानंतर साडेदहा वाजता सोहळा तोंडले बोंडले गावाकडे मार्गस्थ झाला. माळखांबी गाव छोटे असल्याने दिंड्या पुढे येऊन थांबतात. फळबागेतील सावलीला बसले होते. सोहळा येताच ते आपापल्या दिंडीत सहभागी झाले.

तोंडले- बोंडले गावाच्या हद्दीत उखळी तोफांची सलामी देऊन स्वागत केले. गावाकडे जाताना मोठा उतार आहे. तेथे नगारखाना व अश्व बारा वाजता पोचले. काका चोपदार यांनी दिंड्या थांबविल्या. त्यातील एक एक दिंड्यांना संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील ‘तुका म्हणे धावा आहे पंढरी विसावा’ असे म्हणत रथापुढील २६ दिंड्या सोडले. साडे बारा वाजता श्रीतुकोबारायांची पालखी देखील धावत तोंडले- बोंडले गावात पोचले. यावेळी दुपारी एक वाजता संत सोपानकाका, संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांच्या भेट झाली. दरम्यान, तोंडले- बोंडले गावात आज संत ज्ञानेश्वर महाराज, संत सोपानकाका, संत तुकाराम महाराज यासह अनेक पालख्या दुपारी आल्या होत्या.

कोरोनाच्या काळात करमले नाही. आता वारी सुरू झाल्याने आनंदाचे वातावरण आहे. त्यामुळे धाव्याला वेगाने धावलो. त्यात खूप आनंद मिळाला.

- भागीरथी सतपळे, करजगाव माकणी, जि.उस्मानाबाद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat case : अशोक खरात प्रकरणातील महिलांचे अश्लील व्हिडिओ व्हायरल करताय? तर थांबा, पोलिसांची पहिली कठोर कारवाई

8th Pay Commission Update : सरकारी कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपणार ? आठव्या वेतन आयोगाच्या रिपोर्टबाबत सरकारकडून मोठी अपडेट !

डम्पर मालकाने पगार थकवला; पैशासाठी सतत विनवणी, तरीही हाती निराशा, चालक संतापला अन्... थरारक व्हिडिओ व्हायरल

विना ID प्रूफ वापरता येणार नाही फेसबुक-इंस्टाग्राम! मोदी सरकारने तयार केला 'डिजिटल चक्रव्यूह'; जाणून घ्या नवा नियम

Pune Metro News: पुण्यातील भुयारी मेट्रो मार्गावर आता ‘रूट मार्कर’ बसणार; बोगद्याला मोठे छिद्र, नागरिकांना परवानगी घ्यावी लागणार!

SCROLL FOR NEXT