Dr. sadanand more said history of pandharpur wari and 'Gyanba Tukaram' gajar in wari unplugged
Dr. sadanand more said history of pandharpur wari and 'Gyanba Tukaram' gajar in wari unplugged sakal
वारी

'ग्यानबा तुकाराम' गजर पहिल्यांदा कुणी केला माहितीय? वाचा वारीचा इतिहास..

नीलेश अडसूळ

ashadhi wari 2022 : आषाढाची चाहूल लागताच मनाला ओढ लागते ती पंढरीच्या वारीची. हरिमय झालेले असंख्य वारकरी कित्येक किलोमीटरचा रस्ता तुडवत त्या पांडुरंग परमात्म्याला पाहण्यासाठी जातात, आणि हा अनुपम सोहळा उभा महाराष्ट्र तल्लीन होऊन पाहत असतो. या वारीमध्ये विठू नामाचा गजर तर होतोच तर पण त्याहीपेक्षा अधिक नामघोष घुमतो तो 'ग्यानबा तुकाराम' गजराचा. मग प्रश्न पडतो जर आराध्य दैवत विठ्ठल आहे मग गरज त्यांचे भक्त असलेल्या संत ज्ञानेश्वर आणि संत तुकारामांच्या नावाचा का? पण यामागेही एक रंजक इतिहास आहे. आपण ते नाम सहज मुखी घेतो खरे पण आज त्याचा इतिहासही जाणून घेऊया... (ashadhi wari 2022) (Dr. sadanand more said history of pandharpur wari in wari unplugged) (Dr. sadanand more said history of pandharpur wari and 'Gyanba Tukaram' gajar in wari unplugged)

प्रस्थान सोहळे पार पडले. आता वारी पुणे ओलांडुन पुढे आली. तुकाराम महाराजांची पालखी यवत पर्यंत आली तर ज्ञानोबारायांची पालखी सासवड पर्यंत आली. या प्रवासात 'ग्यानबा तुकाराम' नामाचा अखंड गजर सुरू आहे. पण तुम्हाला माहितीय का या हजारो वर्षांच्या पंढरीच्या वारीमध्ये पालखी परंपरा नव्हती. आधी केवळ भगवा ध्वजम तुळस आणि हरिनाम सोबत घेऊन पंढरीची वारी केली जायची. पण तुकाराम महाराज वैकुंठवासी गेल्यानंतर महाराष्ट्रात मोठी अराजकता माजू लागली. त्यावेळी पंढरीची वारी सामाजिक ऐक्याच प्रतीक होती. पण परकीय आक्रमनात आपल्यालाही आपली ताकद दाखवणे गरजेचे होते.. मग.. निर्णय झाला.. हा आता हा निर्णय काय, कोणता आणि कसा हे जर ऐकायचं असेल तर तुम्हाला सकाळ ऑनलाइनच्या ''वारी unplugged'' या विशेष पॉडकास्टला भेट द्यावी लागेल. खाली त्याची लिंक दिलेली आहेच.. त्यामुळे जरूर ऐका.. ही पालखी परंपरा कशी आणि कधी सुरू झाली..

संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी या विशेष कार्यक्रमात मार्गदर्शन केले आहे. पालखी परंपरा कशी आणि कधी सुरू झाली यासोबतच एक महत्वाची बाब यातून समोर आली ती म्हणजे 'ग्यानबा तुकाराम' गजर. जेव्हा विठ्ठल नामाचा गजर सुरू होता तेव्हा ज्ञानाबा तुकाराम नामाचा गजर करण्याची खरी गरज त्यावेळी भासली. मग इतके सकळ संत असताना केवळ संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज त्यांच्याच नामाचा गजर का, आणि तो कधी सुरू झाला याचाही एक इतिहास आहे. तेव्हा वर दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि ऐका ही वारीची दिव्य परंपरा.. '

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covishield बनवणाऱ्या कंपनीने ब्रिटिश कोर्टात मान्य केले लसीचे दुष्परिणाम! कोणते साईड एफेक्ट्स होतात जाणून घ्या

Share Market Opening: शेअर बाजाराची वाढीसह सुरुवात; निफ्टी बँक पुन्हा नवीन विक्रमी उच्चांकावर

Rohit Sharma Birthday : 'सलाम रोहित भाई...' मुंबईने टीम इंडियाच्या कर्णधारचा बड्डे अनोख्या पद्धतीने केला साजरा - Video

VIDEO: वडील असावेत तर असे! घटस्फोट झालेल्या मुलीचे माहेरी केले जंगी स्वागत; व्हिडिओ होतोय व्हायरल

Latest Marathi News Live Update : विजय शिवतारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला

SCROLL FOR NEXT