Dr. sadanand more said history of pandharpur wari in wari unplugged  sakal
वारी

'वारी' का, कधी आणि कशी सुरू झाली हे तुम्हाला माहितीये का?

संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सदानंद मोर यांनी उलगडला वारीचा प्रवास..

नीलेश अडसूळ

ashadhi wari 2022 : पंढरीची वारी म्हणजे महाराष्ट्रात साजरी होणारा एक मोठा सणच. हा सण म्हणजे फक्त हरिनामाचा गजर आणि निस्सीम भक्ती. आषाढाची चाहूल लागताच मनाला ओढ लागते ती पंढरीच्या वारीची. हरिमय झालेले असंख्य वारकरी कित्येक किलोमीटरचा रस्ता तुडवत त्या पांडुरंग परमात्म्याला पाहण्यासाठी जातात, आणि हा अनुपम सोहळा उभा महाराष्ट्र तल्लीन होऊन पाहत असतो. गेली दोन वर्ष करोनामुळे ही वारी होऊ शकली नाही. पण जणू आपली जन्मदात्री माऊलीच आपल्याला भेटली नाही इतकी खंत सर्वांना लागली. पण यंदा हे मळभ दूर झालं आणि वारीचा मार्ग मोकळा झाला. (ashadhi wari 2022)

(Dr. sadanand more said history of pandharpur wari in wari unplugged)

प्रस्थान सोहळे पार पाडत 'ग्यानबा तुकाराम' गजर करत पालख्या आता पंढरपूरच्या दिशेने निघाल्या आहेत. हा पंढरीचा पांडुरंग म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत. ही पंढरीची वारी हजारो वर्ष अविरत सुरू आहेआणि ती पुढेही राहील पण वारी म्हणजे काय? त्याचं महत्व काय? उद्दिष्ट काय? याविषयी क्वचितच माहिती असते. हाच हरिमय इतिहास, वारीची दिव्य परांपरा आज आपण अगदी सोप्या आणि सध्या शब्दात उलगडणार आहोत.

संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. सदानंद मोर म्हणतात, 'महाराष्ट्रात असंख्य प्रथा आहेत पण ही 'पंढरीची वारी' म्हणजे प्रथा नाही तर आपल्या विठ्ठलाप्रती मनोभावे केलेली उपासना आहे. जी अखंड आणि अभंग सुरू आहे.' या शिवाय वारी म्हणजे काय, ती का करावी, त्याचा उद्देश काय आणि वारी विषयी तुम्हाआम्हाला माहीत नसलेल्या असंख्य गोष्टी सदानंद मोरे यांनी सांगितल्या आहेत. पण त्या जर तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील तर 'वारी unplugged' ही सकाळ ऑनलाईनची ही विशेष पॉडकास्ट मालिका ऐकावी लागेल. ज्याची लिंक खाली जोडली आहे.

या विशेष पॉडकास्ट मालिकेत पंढरीच्या वारी विषयी आजवर कधीही न ऐकलेली माहिती, वारीचा इतिहास आपण उलगडणार आहोत. यासाठी संत साहित्याचे अभ्यासक दोन सदानंद मोरे मार्गदर्शन करणार आहेत. आजवर आपण पंढरीची वारी पहिली असेल पण या पॉडकास्टच्या माध्यमातून केलेली संवाद वारीही न चुकवावी अशीच आहे. तेव्हा जरूर ऐका 'वारी unplugged'.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा M. Chinnaswamy Stadium वरील हा शेवटचा सामना कसा? नेमकी भानगड काय? Explained

IPL 2026 Point Table: विराट कोहलीचे शतक हुकले, देवदत्त पडिक्कलने चागंलेच झोडले; RCB चा घरच्या मैदानावरील शेवटच्या लढतीत विजय

Paytm Bank: पेटीएम पेमेंट्स बँकेचा परवाना रद्द! वापरकर्त्यांवर काय परिणाम होणार? पेमेंट करता येणार का? जाणून घ्या...

Manohar Mama Arrested: आणखी एका बाबाला अटक! स्वतःला बाळूमामाचा अवतार सांगायचा; कुर्डुवाडीत गुन्हा दाखल

RCB vs GT Live: विराट कोहलीने इतिहास रचला! IPL मध्ये असा पराक्रम करणारा पहिलाच फलंदाज ठरला; गेल, रोहितच्या यादीत स्थान

SCROLL FOR NEXT