Dr. sadanand more said history of pandharpur wari ringan and ashwa in wari unplugged sakal
वारी

वारीसमोर चालणाऱ्या अश्वालाही आहे परंपरा, काय आहे वारीचा लष्कराशी संबंध..

पंढरीच्या वारीचे आणि मराठा लष्कराचे एक जुने नाते आहे, आज लष्कर नसले तरी परंपरा टिकून आहे.

नीलेश अडसूळ

ashadhi wari 2022 : आषाढाची चाहूल लागताच मनाला ओढ लागते ती पंढरीच्या वारीची. हरिमय झालेले असंख्य वारकरी कित्येक किलोमीटरचा रस्ता तुडवत त्या पांडुरंग परमात्म्याला पाहण्यासाठी जातात, आणि हा अनुपम सोहळा उभा महाराष्ट्र तल्लीन होऊन पाहत असतो. या वारीतील एक महत्वाचा आणि अविभाज्य घटक म्हणजे 'रिंगण'. ही रिंगण पाहण्यासाठी वारकरी अत्यंत आतुर झालेले असतात. याच रिंगण परांपरे विषयी ही खास माहिती... (ashadhi wari 2022) (Dr. sadanand more said history of pandharpur wari ringan and ashwa in wari unplugged) (Dr. sadanand more said history of pandharpur wari)

पंढरीच्या वारीत अवघ्या जगाचे लक्ष लागलेले असते ते संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांकडे, आणि अर्थातच जेव्हा पालख्या येतात तेव्हा येतो अश्व. माऊली आणि तुकोबारायांचे मानाचे अश्व आणि त्या अश्वांनी घातलेले रिंगण यालाही एक परंपरा आहे. ही परंपरा आध्यात्मिक किंवा धार्मिक नसून त्याला मराठा लष्कराचा इतिहास आहे. ऐतिहासिक काळापासून चालत आलेल्या हा वारीवर मराठा सरदारांचे कायमच लक्ष राहिलेले आहे. परमेश्वराची सेवा आणि धर्माचे रक्षण म्हणून मराठा सरदार लष्कर घेऊन वारीत यायचे. पुढे यातूनच काही परंपरा सुरू झाल्या आणि त्याचाच भाग म्हणजे 'रिंगण'. आता हे रिंगण म्हणजे काय, ते कसे घातले जाते, त्याची आध्यात्मिक बाजू काय, हे अश्व कुणाचे असतात, त्याची काय परंपरा आशा अनेक प्रश्नांचा उलगडा सकाळ ऑनलाइनच्या 'वारी unplugged' या विशेष कार्यक्रमात करण्यात आला आहे. संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी पंढरपूरच्या वारीतील आपल्याला माहीत नसलेल्या अनेक गोष्टी या पॉडकास्ट मध्ये सांगितल्या आहेत. तेव्हा वारीची रिंगण परंपरा आणि लष्कराशी असलेला संबंध तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर नक्की ऐका..

संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी या विशेष कार्यक्रमात आपल्याला मार्गदर्शन केले आहे. पंढरपूरची वारी कधी सुरू झाली, भागवत धर्म म्हणजे काय, रिंगण म्हणजे काय यासह वारीतील अनेक माहीत नसलेल्या गोष्टी, काही गमतीजमती, परंपरा त्यांनी 'वारी unplugged ' या पॉडकास्ट मध्ये सांगितल्या आहे. वारी सुरु होण्यापासून ते आषाढी एकदशी पर्यंतचा प्रवास विविध भागांमधून आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत. तेव्हा वारीची ही दिव्य परंपरा आणि आपला इतिहास जाणून घेण्यासाठी 'वारी unplugged' हा कार्यक्रम नक्की ऐका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा M. Chinnaswamy Stadium वरील हा शेवटचा सामना कसा? नेमकी भानगड काय? Explained

IPL 2026 Point Table: विराट कोहलीचे शतक हुकले, देवदत्त पडिक्कलने चागंलेच झोडले; RCB चा घरच्या मैदानावरील शेवटच्या लढतीत विजय

Paytm Bank: पेटीएम पेमेंट्स बँकेचा परवाना रद्द! वापरकर्त्यांवर काय परिणाम होणार? पेमेंट करता येणार का? जाणून घ्या...

Manohar Mama Arrested: आणखी एका बाबाला अटक! स्वतःला बाळूमामाचा अवतार सांगायचा; कुर्डुवाडीत गुन्हा दाखल

RCB vs GT Live: विराट कोहलीने इतिहास रचला! IPL मध्ये असा पराक्रम करणारा पहिलाच फलंदाज ठरला; गेल, रोहितच्या यादीत स्थान

SCROLL FOR NEXT