(Dr. sadanand more said why Warkari sampraday has survived for thousands of years in wari unplugged) sakal
वारी

'या' कारणामुळे हजारो वर्षे उलटूनही वारकरी संप्रदाय टिकून आहे..

महाराष्ट्रात एकेकाळी अनेक संप्रदाय होते, पण वारकरी संप्रदाय एकमेव आहे जो आजही भक्कम आहे.

नीलेश अडसूळ

ashadhi wari 2022 : पंढरीची वारी. आपल्या सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय.. आषाढाची चाहूल लागताच मनाला ओढ लागते ती पंढरीच्या वारीची. हरिमय झालेले असंख्य वारकरी कित्येक किलोमीटरचा रस्ता तुडवत त्या पांडुरंग परमात्म्याला पाहण्यासाठी जातात, आणि हा अनुपम सोहळा उभा महाराष्ट्र तल्लीन होऊन पाहत असतो. ही वारी काही आजची नाही. गेली हजारो वर्षे या पांडुरंगाच्या पायावर डोकं ठेवायला लाखों वारकरी पायी वारी करत पंढरपूरला जात आहेत.

या महाराष्ट्रात एकेकाळी अनेक संप्रदाय होते. त्यातले कित्येक संप्रदाय आज नाहीत किंवा तितक्या मोठ्या प्रमाणात त्याचे अनुयायी नाहीत. पण वारकरी संप्रदाय असा एकमेव संप्रदाय आहे जो हजार वर्षाहून अधिक काळ टिकून आहे आणि दिवसेंदिवस वाढतोच आहे. म्हणूनच कदाचित ही वारी दिवसेंदिवस आपल्याला अधिक मोठी आणि समृद्ध झाल्याची दिसते. पण त्यामागेही काही खास कारण आहे.. (ashadhi wari 2022) (Dr. sadanand more said history of pandharpur wari in wari unplugged) (Dr. sadanand more said history of pandharpur wari)

संत ज्ञानेश्वरांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला आणि संत तुकाराम महाराज त्याचे कळस झाले असे म्हंटले जाते. पण ही वारी संत ज्ञानेश्वरांच्याही आधीपासून सुरू आहे. ज्ञानेश्वर महाराजांचे आई वडीलही वारीला गेल्याचे दिसते. त्यामुळे ही परंपरा हजार वर्षे जुनी आहे. ज्ञानेश्वरांपासून वारकरी संप्रदायाचा खरा प्रचास प्रचार झाला असे म्हणता येईल. त्यावेळी आपल्याकडे नाथ संप्रदाय, महानुभाव संप्रदाय आणि इतर अनेक संप्रदाय अस्तित्वात होते. पण केवळ वारकरी संप्रदाय असा होता जो घराघरात आणि मनामनात पोहोचला. काळानुसार वाढलाही आणि समृद्धही झाला. आज लाखों वारकरी त्या संप्रदायाचे आचरण करतात. या संप्रदायात अशी नेमकी काय ताकद असेल, कोणती खास बात असेल ज्यामुळे हा संप्रदाय आज केवळ महाराष्ट्रात नही तर जगभरात पोहोचलाय.. वारकरी संप्रदायाची ती खास बात तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर खाली दिलेल्या लिंकवर नक्की क्लिक करा.. ((Dr. sadanand more said why Warkari sampraday has survived for thousands of years in wari unplugged))

या भागात तुम्हाला केवळ वारीच नाही तर वारकरी संप्रदाय, तो का आणि कसा वाढला, वारकरी संप्रदायाने समाजाला कोणती महत्वाची देणगी दिली याचीही माहिती संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी उलगडली आहे. यासह वारीतील अनेक माहीत नसलेल्या गोष्टी, काही गमतीजमती, परंपरा त्यांनी 'वारी unplugged ' या पॉडकास्ट मध्ये सांगितल्या आहे. वारी सुरु होण्यापासून ते आषाढी एकदशी पर्यंतचा प्रवास विविध भागांमधून आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत. तेव्हा वारीची ही दिव्य परंपरा आणि आपला इतिहास जाणून घेण्यासाठी 'वारी unplugged' हा कार्यक्रम नक्की ऐका.


सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EPFO: आता नोकरी बदलली तरी पीएफची चिंता नाही! PF आपोआप ट्रान्सफर होणार; पण कसा? वाचा ईपीएफओचा मोठा निर्णय

IND vs SA, 3rd T20I: अभिषेक शर्मा बरसला, शुभमन गिलनेही दिली साथ; टीम इंडियाची दणदणीत विजयासह मालिकेत आघाडी

गोतस्करी करणारी वाहने स्क्रॅप करावीत! आमदार कोठे यांची अधिवेशनात मागणी; सोलापुरात पुढच्या शैक्षणिक वर्षात सुरु होणार शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय

IND vs SA, T20I: जसप्रीत बुमराह अचानक घरी गेला, पुढच्या दोन टी२० सामन्यात खेळणार की नाही? BCCI ने दिले अपडेट

३० हजार फूट उंचीवर मृत्यूशी झुंज! इंडिगो विमानात घडलेला तो थरारक क्षण! कोल्हापूरकर डॉक्टर बनल्या 'देवदूत'

SCROLL FOR NEXT