लोणंद - ढोल- लेझीमचा दणदणाट... गगनभेदी तुताऱ्यांचा सूर... टाळ- मृदंगाचा गजर... अन्‌ माउली नामाच्या जयघोष... अशा जल्लोषी वातावरणात शनिवारी माउलींच्या पादुकांना नीरा नदीत स्नान घालण्यात आले. 
वारी

लोणंदनगरीत माउलींचा जयघोष

रमेश धायगुडे

पालखीचे उत्साहात स्वागत; पादुकांना नीरा नदीत स्नान

लोणंद - श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे आज दुपारी १.३९ वाजता पाडेगाव (ता. खंडाळा) येथे जिल्ह्यात आगमन झाले आणि त्याचबरोबर दिंड्या-पताकांची दाटी... न उरली भेदभावाची ताटी, असेच काहीसे वातावरण निर्माण होऊन जो तो विठ्ठल नामाच्या गजरात, भक्तिभावात दंग झाला. त्या वेळी जिल्ह्याच्या वतीने पालखी सोहळ्याचे उत्साही वातावरणात स्वागत करण्यात आले. 

नीरा (ता. पुरंदर) येथील विसावा आटोपून पालखी सोहळा दुपारी एक वाजता लोणंदकडे येण्यासाठी निघाला. नीरा नदीच्या जुन्या पुलावरून पालखी रथ नीरा नदीच्या अलीकडील तीरावर येताच माउलींच्या पादुका आळंदीपासूनच्या वाटचालीत प्रथमच पालखी रथातून बाहेर काढण्यात आल्या. पालखी सोहळ्याचे मालक राजाभाऊ आरफळकर, सोहळा प्रमुख अभय टिळक, प्रमुख विश्‍वस्त डॉ. अजित कुलकर्णी व अन्य पुजाऱ्यांच्या 
हस्ते नीरा नदीतील दत्त घाटावर नेऊन तेथे

चांदोबाचा लिंब येथे आज उभे रिंगण
वारकऱ्यांच्या आगमनाने लोणंदनगरी माउलीमय झाली आहे. सर्वत्र दिंड्या व वारकऱ्यांना अन्नदान व अन्य सर्व प्रकारच्या सेवा पुरवण्याची सर्वच यंत्रणाची लगबग सुरू आहे. उद्या (ता. २५) रोजी दुपारी दीड वाजता पालखी तरडगाव मुक्कामासाठी प्रस्थान ठेवणार आहे. तत्पूर्वी चांदोबाचा लिंब येथे पालखी सोहळ्याचे पहिले उभे रिंगण होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Digital Crop Survey: ई-पीकच्या सर्व नोंदींची होणार पडताळणी; पारदर्शकतेसाठी नवी नियमावली; चुका टाळण्यासाठी प्रशासनाचे पाऊल, असे आहेत नवीन बदल..

मोबाईल चार्जिंगने घात केला, स्फोट होताच संपूर्ण घराची झाली राखरांगोळी, नेमकी कुठं घडली घटना?

Pune Bengaluru Highway: पुणे-बंगळूर महामार्गावर मृत्यूचा धोका वाढला; विरमाडे फाट्यावर अपघातांची मालिका, ग्रामस्थ संतप्त

Auto Rickshaw Permit: राज्यात नवीन ऑटोरिक्षा परमीट बंद; सोलापुरात जुन्या परमीटला लाखोंची किंमत, नवीन नियमावलीची चर्चा..

विजयचा करिश्मा! बहुमत जुळवताना दमछाक, पण विश्वासमत ठरावात १४४ मते; DMKचं वॉकआऊट, नाट्यमय घडामोडी

SCROLL FOR NEXT