वारी

पालखीत सहभागी होणाऱ्या वाहनांची तपासणी करून घ्या 

सकाळवृत्तसेवा

पुणे - "पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या सर्व वाहनांची तपासणी करून घ्यावी,' असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयाने केले आहे. या वाहनांच्या तपासणीसाठी सुटीच्या दिवशीही आळंदी आणि पिंपरी-चिंचवड येथील आरटीओ कार्यालय सुरू ठेवण्यात येणार असून, ती विनामूल्य असेल. 

ही तपासणी येत्या शनिवारी (ता. 10) आणि रविवारी (ता. 11) कार्यालयीन वेळेत आळंदी आणि पिंपरी-चिंचवड येथील कार्यालयात करण्यात येईल. 16 जूनपर्यंत ही सुविधा उपलब्ध राहणार असून, वाहनचालकांनी त्याचा लाभ घ्यावा. तपासणीच्या वेळी आवश्‍यक ती सर्व कागदपत्रे बरोबर आणावीत, असे आवाहन आरटीओकडून करण्यात आले आहे. 

संत तुकाराम महाराज यांची पालखी देहू येथून पुढील शुक्रवारी (ता. 16), तर आळंदी येथून संत ज्ञानेश्‍वर महाराज यांची पालखी शनिवारी (ता. 17) पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. दरवर्षी पालखीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाहने सहभागी होतात. पालखी मार्गावर अपघात होऊ नयेत, रस्त्यात वाहने बंद पडू नयेत, यासाठी "आरटीओ'कडून या वाहनांची तपासणी करून दिली जाते. त्यानुसार या वर्षीही वाहनांची विनामूल्य तपासणी करून देण्यात येणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: मुंबईला रेड अलर्ट! कर्मचाऱ्यांनो 'वर्क फ्रॉम होम' करा, बाहेर पडू नका; BMCकडून आवाहन

Pune Flood: इंद्रायणीला पूर, आळंदीत २५० वारकऱ्यांचे स्थलांतर; पूल पाण्याखाली... कठडे अन् चेंजिंग रूम वाहून गेल्या, दुकानांसह घरांमध्ये पाणी

Latest Marathi News Live Update : पुणे-मुंबई दरम्यानची एसटी वाहतूक पुढील आदेश येईपर्यंत बंद राहणार

Mumbai Rain : मुंबईतील पावसाचा फटका लोकल सेवेला; तिन्ही मार्गावरील वाहतूक १५ ते २० मिनिटं उशीराने...

Pune Rain : मावळमध्ये पावसाचे रौद्र रुप ! पुणे-मुंबई महामार्गावर टेम्पो चालकासह वाहून गेला, NDRF ने खासगी बसमधील ३७ जणांचे वाचवले प्राण

SCROLL FOR NEXT