Saath-Chal 
वारी

#SaathChal आई-वडिलांच्या स्वास्थ्यासाठी ‘साथ चल’

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - जून उजाडला, की वेध लागतात आषाढी वारीचे आणि पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणाऱ्या अनुक्रमे संत ज्ञानेश्‍वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यांचे. त्यात सहभागी वैष्णव टाळमृदंगाचा गजर आणि ‘ज्ञानोबा-तुकोबांचा’ जयघोष करीत पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरात दाखल होतात.

त्यांच्यासोबत आई-वडिलांच्या स्वास्थ्यासाठी दोन पावले चालावीत, त्यांच्या निरोगी आयुष्याकडे लक्ष द्यावे, या उद्देशाने ‘सकाळ माध्यम समूह’ व ‘फिनोलेक्‍स केबल्स कंपनी’तर्फे ‘वारी विठुरायाची आणि आई-वडिलांच्या देखभालीची’ या संकल्पनेतून ‘साथ चल’ उपक्रम २५ व २६ जूनला पिंपरी-चिंचवडमध्ये आणि २८ जूनला पुण्यात राबविणार आहे. 

आषाढी वारीनिमित्त देहू येथून संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा २४ जूनला देहू येथून, तर संत ज्ञानेश्‍वर महाराज यांचा पालखी सोहळा २५ जूनला आळंदी येथून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. संत तुकाराम महाराज पालखी सोहळा २५ जूनला पिंपरी-चिंचवडमध्ये दाखल होईल. त्या वेळी या उपक्रमाचा पहिला टप्पा दुपारी चार ते सायंकाळी सात या वेळेत निगडीतील भक्ती-शक्ती चौक ते आकुर्डीतील विठ्ठल मंदिर असा असेल. २६ जूनला पहाटे पाचला पालखी पुण्याकडे मार्गस्थ होते. त्या दिवशी साथ चलचे सहा टप्पे होतील. पहिला टप्पा पहाटे पाच वाजता सुरू होईल. शेवटच्या टप्प्याचा समारोप फुगेवाडी येथील मेगामार्टजवळ होईल. २८ जूनला सकाळी आठ ते दुपारी एक या वेळेत पुण्यातील पुलगेट ते हडपसर गाडीतळदरम्यानच्या वाटचालीचे दोन टप्पे असतील. यासाठी आळंदी येथील संत ज्ञानेश्‍वर महाराज देवस्थान, देहू येथील संत तुकाराम महाराज संस्थान, स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य लाभले.

असे असतील टप्पे
२५ जून : भक्ती-शक्ती निगडी ते आकुर्डी विठ्ठल मंदिर
२६ जून : आकुर्डी विठ्ठल मंदिर ते खंडोबा माळ, खंडोबा माळ ते चिंचवड स्टेशन, चिंचवड स्टेशन ते मोरवाडी चौक, मोरवाडी चौक ते एचए वसाहत प्रवेशद्वार, एचए प्रवेशद्वार ते नाशिक फाटा आणि नाशिक फाटा ते मेगामार्ट फुगेवाडी.
२८ जून : पुण्यातील पुलगेट बस स्थानक ते भैराबा मंदिर, भैरोबा मंदिर ते लोहिया उद्यान हडपसर.

सहभाग नोंदणीसाठी व्हॉटस्‌ॲप क्रमांक - ७७२१९७४४४७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रातील विद्यापीठांवर राज्यपालांची कडक नजर! त्रैमासिक अहवाल सादर करणे अनिवार्य; प्रशासनाला नवा धक्का

R Ashwin ने कसोटीतून निवृत्तीसाठी गौतम गंभीरला ठरवले जबाबदार? पर्थ कसोटीत काय घडले ते सांगितले... मन मोकळे केले...

"साडी चुरगळू नये म्हणून ती.." प्रसिद्ध डिझायनरचा ऐश्वर्याविषयी धक्कादायक खुलासा; म्हणाला..

Gudipadwa: गुढीपाडव्याला घरपोच पुरणपोळी! महापालिकेचा उपक्रम; ऑर्डर करण्याची प्रक्रिया काय?

Latest Marathi News Live Update : महापौर रितू तावडेंच्या अडचणी वाढल्या ! शिक्षक मारहाण प्रकरणात दोषमुक्तीला न्यायालयाचा नकार

SCROLL FOR NEXT