वारी

ज्ञान आणि भक्ती वारीचा संयोग

डॉ. अजित कुलकर्णी, प्रमुख विश्‍वस्त, आळंदी देवस्थान

बावन्न वर्षे सलग एकादशी चुकविली नाही. माझे मूळ घर दत्त संप्रदायाचे आहे. आजोळ समर्थ संप्रदायाचे आहे. मी वारकरी संप्रदायात वाढत आहे, खरे तर हा त्रिवेणी संगमच आहे.

विठ्ठल हा चैतन्याचा गाभा, आनंदाचा कंद म्हणून मी पाहतो. "जैसा मनी भाव, तया तैसा अनुभव' याप्रमाणे साधकाचे अंतःकरण जोपर्यंत संवेदनशील होत नाही, तोपर्यंत ज्ञानाचे भक्तीत रूपांतर होत नाही. ज्ञान आणि भक्ती हा वारीचा संयोग आहे. वारी ही भक्तीचे सामाजिकरण आहे.

परिवर्तनाचा सोहळा आहे. वाट पाहे उभा, भेटीची आवडी, कृपाळी आवडी उतावीळ, या अभंगानुसार भगवंत पांडुरंग हा वारकऱ्यांची भेटीसाठी वाट पाहत असतो. भक्त वारकरी पांडुरंगाच्या ओढीने पुढे जात असतो. असे हे अनोखे नाते वारकरी आणि विठ्ठल यांचे आहे. हे शब्दांत दाखविता येत नाही किंवा शब्दांत व्यक्तही करता येत नाही. ते अनुभवावेच लागते. आमच्या घरात वारीची परंपरा आहे. गेली पंचवीस ते तीस वर्षे वारीत चालायची संधी मिळाली. बावन्न वर्षे सलग एकादशी चुकविली नाही. माझे मूळ घर दत्त संप्रदायाचे आहे. आजोळ समर्थ संप्रदायाचे आहे. मी वारकरी संप्रदायात वाढत आहे, खरे तर हा त्रिवेणी संगमच आहे. मला वारीतील आनंदाचे स्वरूप आहे, तोच माझ्या मनातला विठ्ठल आहे. नाव घेतल्या घेतल्या जो मनात प्रकट होतो तो विठ्ठल.
(शब्दांकन - शंकर टेमघरे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नागपूर पदवीधर निवडणूक; दुसऱ्या पसंतीच्या मतांमध्ये वंजारींची मुसंडी; महायुतीच्या कोहळेंचे मताधिक्य केले सर; निकालाकडे राज्याचं सर्वांचे लक्ष

Mumbai Night Cab Viral Video : "आज मला पुरुष असल्यासारखं वाटलं!"; पहाटे २ वाजता मुंबईत उतरलेल्या तरुणीने 'त्या' कॅबमधून प्रवास केला अन्... व्हिडिओ तुफान व्हायरल!

Mumbai News : वाराणशीतून महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांसाठी मदतीचा हात; काशी महाराष्ट्र सेवा समितीचा पुढाकार

WPL 2027 Auction : सोफी मॉलिनेक्स ठरली महागडी खेळाडू... मुंबई इंडियन्स, RCB चे तगडे संघ तयार; जाणून घ्या सर्व संघांची लिस्ट...

Marathi News Live Updates : वाचा दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT