Dress Fitting
Dress Fitting Sakal
वुमेन्स-कॉर्नर

माय फॅशन : ‘ड्रेसचे फिटिंग खूप महत्त्वाचे’

सकाळ वृत्तसेवा

फॅशन हा प्रत्येकीचा जिव्हाळ्याचा विषय. फॅशन कशी करावी, रंगांची निवड कशी करावी, कोणती काळजी घ्यावी, कोणत्या गोष्टींचा विचार करावा याबाबत सेलिब्रिटींनी सांगितलेल्या टिप्सचे सदर.

- अमृता पवार

फॅशन हा प्रत्येकीचा जिव्हाळ्याचा विषय. फॅशन कशी करावी, रंगांची निवड कशी करावी, कोणती काळजी घ्यावी, कोणत्या गोष्टींचा विचार करावा याबाबत सेलिब्रिटींनी सांगितलेल्या टिप्सचे सदर.

मला वैयक्तिकरीत्या ट्रॅडिशनल कपडे खूप आवडतात. साड्या, कुर्ते, ड्रेसेस हे प्रकार जास्त प्रमाणात आवडतात. कुठलीही फॅशन करताना सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, त्या ड्रेसचे, टॉपचे किंवा त्या जिन्सचे फिटिंग खूपच महत्त्वाचे असते. कारण, त्यावरच आपलं व्यक्तिमत्त्व खुललं अन् फुललं जातं. मात्र, बहुतेक वेळी आपण त्याकडेच दुर्लक्ष करत असतो. आपल्याला जे कपडे आवडतात किंवा जे कपडे घालून आपल्याला कंफर्टेबल वाटते, आत्मविश्वास वाढतो, असेच कपडे आपण घातले पाहिजेत. ते कपडे साधे जरी असले, तरी ते आपल्याला सूट होतात, फॅशनेबल दिसतात. हाच प्रयोग मी आवर्जून करते, कारण हाच माझा फॅशन फंडा आहे. त्यामुळे कपडे निवडताना मी खूपच काळजी घेते.

कपड्यांच्या रंगांची निवड करताना गोंधळ होत असेल, तर मी न्यूट्रल कलर पसंत करते. त्यामध्ये ब्लॅक-व्हाइट, क्रीम-बेज हे कलर पसंत करते. हे कपडे शक्यतो सर्वांनाच सूट करतात. अनेक जण या रंगांचे कपडे परिधान करत असतात अन् त्यांना ते चांगलेही दिसतात. मी अभिनय क्षेत्रात असल्याने आपल्या भूमिकेप्रमाणे कपड्यांची रंगसंगती निवडावी लागते. सध्या मी ‘झी टीव्ही’वरील ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ या मालिकेत आदितीची भूमिका साकारत आहे. मला आलिया भट्ट हिचे कपडे खूप आवडतात. तिचे सर्व कपडे खूपच कंफर्टेबल असतात. ती स्वतः ‘आउट ऑफ द वे’ जाऊन काही परिधान करत नाही. ती स्वतः त्यामध्ये खूपच कंफर्टेबल दिसते. तसेच, तिच्या चेहऱ्‍यावरही खूप आमविश्वास दिसतो. त्यामुळेच आलिया ही माझी फॅशन आयकॉन आहे.

फॅशनच्या टिप्स

  • आपल्या ड्रेसच्या फिटिंगकडे लक्ष देणे खूपच गरजेचे आहे.

  • कलर कॉम्बिनेशनकडे सर्वाधिक जास्त लक्ष देणे. कारण, त्यावरूनच तुमचे व्यक्तिमत्त्व समोर येते.

  • सध्या जो ट्रेंड सुरू आहे, त्याबरोबर अपडेटेड राहणे खूप गरजेचे आहे.

  • महत्त्वाची गोष्ट म्हणजे कम्फर्टनेस. एखाद्या ड्रेस घातला व त्यात तुम्हाला स्वतःलाच कंफर्टेबल वाटत नसेल, तर असे ड्रेस नक्कीच घालू नका. असे कपडे शक्यतो घालणे टाळावे. जे कपडे कंफर्टेबल असतात ते तुम्ही छान पद्धतीने कॅरी करू शकता.

  • अॅक्सेसरीज ही गोष्ट खूपच महत्त्वाची आहे. कारण, तुम्ही कपडे कितीही छान घातले; पण त्यावर अॅक्सेसरीज नीट नसतील किंवा कपड्यांना सूट होणाऱ्या नसतील, तर तुमचा लूक जरा बिघडू शकतो. लूक डिझाइन करताना या पाच गोष्टींवर खूपच बारकाईने लक्ष द्या. कारण, त्यातूनच आपले व्यक्तिमत्त्व खुलत असते.

(शब्दांकन : अरुण सुर्वे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: निवडणुकीत पाकिस्तानची एन्ट्री! 'राजकुमाराला पंतप्रधान बनवण्यास पाकिस्तान आतुर', मोदींचा राहुल यांच्यावर निशाणा

Ankita Lokhande : "तिला स्टुडंट ऑफ द इयर 3ची ऑफर मिळालीच नव्हती"; अफवांवर अंकिताच्या टीमकडून स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : “लव्ह जिहाद, भू जिहादनंतर आता व्होट जिहाद”, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर टीका

Akshaya Tritiya 2024 : कधी आहे अक्षय्य तृतीया? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्व

Lok Sabha Election: उन्हाचा कहर वाढला! निवडणूक आयोग सतर्क, बिहारनंतर या राज्यातही मतदानाची वेळ वाढवली

SCROLL FOR NEXT