stainless steel puri maker sakal
वुमेन्स-कॉर्नर

किचन गॅजेट्स : स्टेनलेस स्टील पुरी मेकर

श्रावण महिना म्हटले, की विविध सणांची रेलचेल सुरू होते. त्यामुळे बहुतांश घरांमध्ये गोडाचे पदार्थ बनवले जातात. त्यातील जेवणाची लज्जत वाढवणारा पदार्थ म्हणजे पुरी होय.

सकाळ वृत्तसेवा

श्रावण महिना म्हटले, की विविध सणांची रेलचेल सुरू होते. त्यामुळे बहुतांश घरांमध्ये गोडाचे पदार्थ बनवले जातात. त्यातील जेवणाची लज्जत वाढवणारा पदार्थ म्हणजे पुरी होय.

श्रावण महिना म्हटले, की विविध सणांची रेलचेल सुरू होते. त्यामुळे बहुतांश घरांमध्ये गोडाचे पदार्थ बनवले जातात. त्यातील जेवणाची लज्जत वाढवणारा पदार्थ म्हणजे पुरी होय. श्रीखंड आणि बासुंदीचा आस्वाद घेताना पुरीशिवाय पर्याय नाही; परंतु अनेकांना गोलाकार पुऱ्या लाटायला जमत नाही. एकसारखी जाडी असलेली आणि टम्म फुगलेल्या पुरीला यामुळे मुकावे लागते, अनेकदा पुरी गोलाकार दिसावी म्हणून वाटी किंवा ग्लासच्या मदतीने गोलाकार कापली जाते. परंतु, या सगळ्या प्रक्रियेत भरपूर वेळ खर्ची होतो. शिवाय एकसमान अंतरावर कापले न गेल्यामुळे कणकेचा बराचसा भाग वाया जातो. मग पुन्हा तो पुढच्या भागात सामावून घेऊन प्रक्रिया रिपीट करावी लागते. हा सगळा खटाटोप टाळायचा असल्यास, बाजारात स्टेनलेस स्टील पुरी मेकरचा पर्याय उपलब्ध झाला आहे. घाईगर्दीत स्वयंपाक करताना गृहिणींना या पुरी मेकरची पुरेपूर मदत होऊ शकते.

पुरी मेकरचे वैशिष्ट्ये

  • आपल्याला हवी तशी कणीक मळल्यावर नेहमीप्रमाणे ओट्यावर किंवा पोळपाटावर कणकेचा गोळा लाटून घेणे. आणि त्यावर पिझ्झा कट करतो त्या पद्धतीप्रमाणे कटर पहिल्या टोकापासून ते शेवटच्या टोकापर्यंत पुढे सरकत न्यावे. काही वेळातच एकसारख्या आणि गोलाकार आकाराच्या पुऱ्या तयार होतात.

  • या पुरी मेकरला असणाऱ्या स्टीलच्या हॅंडलमुळे पुरी कट करताना उत्तम ग्रिप मिळते; कटर हातातून सटकत नाही. याच्या दोन्ही बाजूंनी अर्धगोलाकारासारख्या डिझाईनमुळे पुरी, पेस्ट्री किंवा कुकीज कट करण्याचे काम सहजरित्या करता येते. अगदी लहान मुलानांही हे काम जमू शकते.

  • या कटरच्या साह्याने, केवळ पुऱ्याच नव्हे तर कुकीजही कट करता येतात.

  • उत्तम दर्जाच्या स्टेनलेस स्टीलपासून बनवले असल्याने गंजत नाही. शिवाय डिशवॉशरसेफही असल्याने स्वच्छ करण्यास कोणतेही नाही. दीर्घकाळ टिकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT