पास्ता करताना किंवा कोणतीही गोष्ट उकडल्यानंतर त्यातलं पाणी निथळायचं असेल तर बऱ्याचदा प्रॉब्लेम होतो. गाळण्यानं करावं म्हटलं तर ते छोटं असतं आणि चाळणीचा वापर करणंही अवघड जातं.
पास्ता करताना किंवा कोणतीही गोष्ट उकडल्यानंतर त्यातलं पाणी निथळायचं असेल तर बऱ्याचदा प्रॉब्लेम होतो. गाळण्यानं करावं म्हटलं तर ते छोटं असतं आणि चाळणीचा वापर करणंही अवघड जातं. अशा परिस्थितीत ‘ॲडजस्टेबल सिलिकॉन क्लिप फॉर पास्ता’ हे विशेष साधन उपयोगी पडतं. ही एक सिलिकॉन क्लिप असते. सिलिकॉन लीड असतात, तशाच प्रकारची; पण वेगळ्या आकारातली आणि गाळण्याचं काम करता येणारी ही क्लिप. ज्या भांड्यात किंवा पातेल्यात पास्ता किंवा तत्सम उकडलेला पदार्थ आहे, त्याला ही स्लिप ताणून बसवायची. त्यानंतर पातेलं व्यवस्थित उभं करून त्यातलं पाणी हळुवारपणे निथळता येतं. क्लिपमुळे पास्ता किंवा इतर गोष्टी खाली पडण्याची शक्यता नसते. शिवाय ते खूप गरम असलं तरी फार काही फरक पडत नाही. भाज्या निथळायला किंवा इतर गोष्टींसाठीही ही ॲडजस्टेबल सिलिकॉन क्लिप वापरता येते.
क्लिपची वैशिष्ट्ये
पास्ता आणि उकडलेले पदार्थ निथळणं अगदी सोपं.
पदार्थाचं तापमान कितीही असलं, तरी काही फरक पडत नाही. अगदी नाजूकपणे पदार्थ निथळून काढता येतो.
वापरायला आणि स्वच्छ करायला अगदी सोपी.
क्लिप कोणत्याही पातेल्याला किंवा भांड्याला बसवता येते.
क्लिप लहान असल्याने कुठेही ठेवता येते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.