waxing-epilator 
वुमेन्स-कॉर्नर

ग्रुमिंग : वॅक्सिंगला एपिलेटरचा पर्याय

संदेश मुळीक

तुम्हाला काही महत्त्वाचा सोहळा किंवा पार्टी फंक्शनसाठी मेक-अप करावाच लागतो. त्याबरोबर फेशिअल, हेअर आणि स्किन ट्रीटमेंटही केल्या जातात. मात्र, या सगळ्यांत सर्वाधिक त्रासदायक ठरते वॅक्सिंग. त्वचेवरील नको असणारे केस काढण्याची प्रक्रिया महिलांच्या दृष्टिने खूप वेदनादायी असते. वॅक्सिंग करायचे नसल्यास अनेकदा रेझरचा वापर केला जातो. या डोकेदुखीवरचा उपाय आहे ''एपिलेटर’. त्वचेवरील नको असणारे केस मुळासहित घालवण्यासाठी वापरला जाणारा सर्वोत्तम पर्याय. ट्रिमरसारखा हा एपिलेटर वापरण्यास अगदी सोपा आहे आणि वेळही खूप कमी लागतो. त्यामुळे बाकी हेअर रिमुव्हल ट्रीटमेंटपेक्षा एपिलेटर वापरण्याकडे महिलांची कल अधिक आहे.

कसे वापराल?
1) सहसा एपिलेटर वापरण्यासाठी त्वचा साफ असावी, त्यासाठी आधी हातपाय धुवून घेणे गरजेचे आहे.
2) सुरुवातीस वापरताना कमीत कमी अंतर ठेवा, त्यामुळे त्यात नेमकेपणा येऊन सर्व केस निघून जातील.
3) शॉवर घेताना किंवा वाहत्या पाण्यात एपिलेटर वापरावे, पण ते वॉटरप्रूफ असावे. यामुळे त्वचा कोरडी पडणे किंवा एपिलेटरच्या ब्लेडमुळे त्वचेला दुखापत होत नाही.
4) एपिलेटर वापरताना ९० डिग्री अँगलचा विचार करून पकडावा व केसांच्या दिशेने वापरावा ज्यामुळे अधिकाधिक केस निघतात.
5) एपिलेटर वापरून झाल्यानंतर त्वचा कोरडी न पडण्यासाठी बॉडी लोशन लावावे.
6) जास्त फोर्स वापरून एपिलाईट करू नका. तसे केल्यास त्वचा लाल होऊन रॅशेस येऊ शकतात.
7) पाण्याचा वापर न करता एपिलेटर वापरत असाल, तर आधी टाल्कम पावडर वापरावी. त्यामुळे त्वचा मुलायम राहण्यास मदत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-US Proposal: इराणची मोठी हालचाल! अमेरिकेला नवा १४ कलमी अणुकराराचा प्रस्ताव पाठवला, कोणत्या अटी ठेवल्या?

IPL 2026 PLAYOFF SCENARIO: दोन संघांचे गुण अन् नेट रन रेट समान राहिले तर काय? चेन्नई सुपर किंग्स, राजस्थान रॉयल्स या पेचात अडकलेत

Elephant Attack Tourist Death : दोन हत्तींच्या झुंजीत 33 वर्षीय महिला पर्यटकाचा चिरडून जागीच मृत्यू; डोळ्यांदेखत पत्नीला वाचवण्यासाठी पतीची धडपड, पण...

बीसीसीआयला RTI कायद्यातून वगळले! CIC चा महत्त्वाचा निर्णय; कारण काय दिले ते वाचा...

ट्रकचा अक्षरशः चेंदामेंदा! १०० वऱ्हाड्यांना घेऊन जाणारा ट्रक पलटी, १२ जणांचा मृत्यू, घटनास्थळावरील थरारक व्हिडिओ समोर

SCROLL FOR NEXT