‘गोष्ट एका पैठणीची’ हा वेगळा चित्रपट बनून तयार आहे. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन शंतनू रोडे यांनी केले आहे आणि या चित्रपटातील प्रमुख भूमिका सायली संजीव या अभिनेत्रीची आहे. सायली आणि शंतनू यांची पहिली भेट झाली ती गोरेगावच्या एका कॉफी शॉपमध्ये. सायली म्हणते, ‘‘शंतनूसरांनी मला या सिनेमाची गोष्ट इतक्या चांगल्या प्रकारे ऐकवली, की मी त्यात पूर्णपणे रमून गेले. सर चित्रपटाची गोष्ट सांगत असताना मला खरोखरच त्या व्यक्तिरेखा समोर दिसू लागल्या.’’
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
शंतनू यांनी सायलीने केलेल्या भूमिका यापूर्वी पाहिल्या नव्हत्या. पण, त्यांची आणि सायलीची भेट झाली, तेव्हा चित्रपटातील व्यक्तिरेखेला ‘जीव’ मिळाला, असे ते सांगत होते. सायलीबद्दल बोलताना ते म्हणाले, ‘‘सायलीची भूमिकेचा अभ्यास करण्याची पद्धत विलक्षण आहे. सहकलाकारांनासुद्धा अभिनेत्री या नात्याने उत्तम सहकार्य करते. सर्वांशी मिळूनमिसळून वागणे, भूमिकेचा सखोल विचार करणे, हे तिच्या स्वभावातील गुण सांगता येतील. ‘गोष्ट एका पैठणीची’मध्ये भोर तालुक्यातील कर्नावडी गावातील एक गृहिणी तिने उत्तम साकारली आहे. सायली उत्तम नकलादेखील करते, असे मी ऐकले आहे आणि ती माझीही नक्कल करायची, असे मला काही जणांनी सांगितले.’’
सायली म्हणते, ‘‘या चित्रपटामधील माझी भूमिका हा माझा ‘ड्रीम रोल’ म्हटला पाहिजे. एक साधी गृहिणी, प्रेमळपणे घर जपणारी आणि वेळप्रसंगी खंबीरदेखील होणारी, अशा वेगवेगळ्या छटा या भूमिकेतून साकारता आल्या. शंतनूसर हे खूप शांत स्वभावाचे दिग्दर्शक आहेत. ते कधीच कोणावर चिडत नाहीत, या गोष्टीचे मात्र मला खूप नवल वाटते.’’
लॉकडाउनच्या काळात शंतनू रोडे यांनी एडिटिंगचा सेटअप आपल्या घरी नेला. एडिटर मनीष शिर्के यांनी या काळात शंतनू रोडे यांच्या घरी एडिटिंगचे काम पूर्ण केले. इतर काही संहितांविषयीसुद्धा त्यांनी या काळात घरीच काम सुरू केले. सायलीचे आई-वडील लॉकडाउनच्या काळात मुंबईतच होते. त्यामुळे सायलीला अनेक वर्षांनंतर आपल्या आई-वडिलांसमवेत आपल्या घरासाठी वेळ देता आला. हळूहळू अनलॉक प्रक्रिया सुरू झाल्यावर तिने या चित्रपटाचे डबिंगचे काम केले.
(शब्दांकन : गणेश आचवल)
Edited By - Prashant Patil
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.